पैनगंगा नदीमध्ये मागील आठवड्यात इसापूर धरणाचे पाणी सोडण्यात आले. परंतु गंजेगाव बंधाऱ्याच्या खालील गावांना पाणी आलेच नाही. याची माहिती मिळता...
पैनगंगा नदीमध्ये मागील आठवड्यात इसापूर धरणाचे पाणी सोडण्यात आले. परंतु गंजेगाव बंधाऱ्याच्या खालील गावांना पाणी आलेच नाही. याची माहिती मिळताच आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी आज पैनगंगा नदीवर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आहे. लागलीच जिल्हाधिकारी डॉ विपीन यांच्याशी संपर्क साधून आणखीन ४ दलघमी पाणी सोडण्याचे मंजूर करून घेतले. त्यामुळे आता शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे मुरली बंधाऱ्यापर्यंत इसापूरचे पाणी पोचणार असल्याने या भागातील शेतकरी, गावकर्यांना दिलासा मिळणार आहे.
हिमायतनगर - कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तालुक्यात १० दिवसाचा जनता कर्फ्यू लावण्यात आला असताना अनेकजण आपली प्रतिष्ठाने उघडून जनता कर्फ्यूच्या आदेशाला हरताळ फासत आहे. याबाबत सोशल मीडियावर उमटत असलेल्या प्रतिक्रियेनंतर आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी दि.२६ एप्रिल रोजी १० वाजता हिमायतनगर शहरात अचानक भेट दिली. आणि अनेकांचे शटर डाऊन झाले.

COMMENTS