कोरोनाच्या जागतिक महासंकटामुळे सार्वजनिक हनुमान जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होऊ शकले नाहीत. पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे या गावात मारुतीचे जागृत देवस्थान आहे . त्यामुळे दरवर्षी या गावात मोठ्या थाटामाटात हनुमान जयंती उत्सव साजरा केला जातो. परंतु गेली दोन वर्षे कोरोनाच्या जागतिक महामारी संकटामुळे हनुमान जयंती उत्सव साजरा होऊ शकला नाही. जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर या परिसरातील थोरांदळे गावातील हनुमान जयंती उत्सव नावाजलेला असतो. या गावात समाजप्रबोधन म्हणून अखंड हरिनाम सप्ताह, परिसरातून येणाऱ्या पाहुण्यांसाठी व सर्व ग्रामस्थांसाठी जुन्या रूढी परंपरेनुसार महाभंडारा म्हणून खंडीभर पुऱ्या, गुळवणी, कढईभर कांद्याची मिरची या पद्धतीचा महाप्रसाद असतो. हनुमान जयंती उत्सवाला या गावातील मुंबईकर व इतर शहरातील सर्व मंडळी कुटुंबासाहित आवर्जून उपस्थित राहतात. मात्र आज कोरोनाच्या संकटामुळे सर्वांनी आपल्या गावातील हमनुमान मंदिरासमोर उभे आहोत, असे समजून घरातच आपल्या कुटुंबासमवेत हनुमान जयंती उत्सव साजरा केला व मारुतीचे दर्शन घेतले. सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
आपला
मारुती विश्वासराव

COMMENTS