सोनपेठ/प्रतिनिधी
मुदगल शिवारात मागील अनेक दिवसांपासून गुन्हेगारी बळावत असल्याचे चित्र दिसून येत असून तालुक्यातील मुदगल येथे घडणाऱ्या अशा घटनामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे दिसून येतंय यात मागील वीस दिवसांपूर्वी मुदगल येथे महिलेला गळा चिरून ठार केल्याची घटना घडली होती.तर त्यापूर्वी एका मुलीचा खून झाला होता.आज घडलेल्या घटनेबाबत अधिक माहीती अशी की,मुदगल येथील अनिल रेडे यांच्या शेतात अज्ञात युवकाचा जाळण्यात आलेला सांगाडा दिसल्याची रेडे यांनी पोलीसांना माहीती दिली असता पोलीसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवून घटनास्थळ गाठत तपास सुरू केला आहे.यावेळी घटनास्थळी परिसरातील बघ्यांनी गर्दी केली होती.तर सदर घटनेची माहिती मिळताच
उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी,पोलीस उपनिरीक्षक डॉ.मनोज अहिरे,पोलीस उपनिरीक्षक लोकलवार,पोलीस हवालदार अशोक सोडगीर,गोपाळ रासवे,पोलीस बिट अमलदार पिंपलपल्ले,पोलीस अंमलदार मुंजा जामगे,साठे,पोलीस पाटील रामकिशन घोडके,आदींनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कार्यवाहीसाठी सुरुवात केली होती.दरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू असणाऱ्या अवैध वाळू उपशामुळे गुन्हेगारी बळावत असल्याची चर्चा होत आहे.

COMMENTS