माजलगाव /प्रतिनिधी
तालुक्यातील प्रत्येक गावी मिशन झीरो डेथ मोहीम सुरू करण्यात आली आहे. पहिला टप्पा 19 एप्रिल ते 10 मे 2021 दरम्यान राबविला जात आहे. आरोग्य विभागाने कोणतीही सुविधा पुरवली नसताना शिक्षकांनी जिवाची पर्वा न करता स्वखर्चातून हॅन्ड ग्लोज, सॅनिटायझर, ऑक्सी मिटर , टेम्परेचर गण इत्यादी साहित्य खरेदी करून राष्ट्रीय कार्यात योगदान देऊन कर्तव्य बजावत आहेत.
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात येत आहे. सर्वेक्षणामध्ये थंडी, ताप, खोकला, सर्दी, श्वास घेण्याचा त्रास, ऑक्सीजन कॉन्स ट्रेशन्स, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय विकार इत्यादी कोवीड-19 सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तीचा शोध घेऊन उपचारासाठी पाठवणे, टेस्टिंग करणे, लसीकरण वाढवणे, उपायोजना करून मृत्यु दर शून्यावर ठेवणे हा मूळ उद्देश आहे. नागरिक सकारात्मक प्रतिसाद देत नाहीत. नियमांचे पालन केले तरच ही मोहीम यशस्वी होईल.
कोरोना चाचणी, कोविड पॉझिटिव्ह आणि लसीकरण बाबत सर्व माहिती संकलित करण्याचे काम तालुक्यातील हिवरा (बु) येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक ओमप्रकाश आगे, चौगुले सर, तोडकर सर, धुमाळ सर, अंगणवाडी च्या आशाताई खरात मॅडम,घायाळ मॅडम, ग्रामसेवक वाहुल यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता राष्ट्रीय कार्यास योगदान देताना भर उन्हात आपले कर्तव्य बजावले आहे.

COMMENTS