नांदेड दि. 26 येथील खालसा प्राथमिक व माध्यमिक शाळेचे सेवानिवृर्त्त शिक्षक स. अमरसिंघ स्व. चरणसिंघ विष्णुपुरीकर यांचे रविवार, दि. 25 एप्रि...
नांदेड दि. 26
येथील खालसा प्राथमिक व माध्यमिक शाळेचे सेवानिवृर्त्त शिक्षक स. अमरसिंघ स्व. चरणसिंघ विष्णुपुरीकर यांचे रविवार, दि. 25 एप्रिल रोजी सकाळी दीर्घ आजारने निधन झाले. शेवटच्या क्षणी त्यांचे वय 76 वर्ष होते. अति नम्र आणि समर्पित भावाने त्यांनी सन 1973 ते 2003 दरम्यान अध्यापनाचे कार्य केले. जत्थेदार संतबाबा कुलवंत सिंघ जी, मीत जत्थेदार संतबाबा ज्योतिंदर सिंघजी यांचेही ते प्राथमिक शिक्षक होते. गुरुद्वारा बोर्ड व्यवस्थापन समितीचे माजी सदस्य स. देवेंद्रसिंघ विष्णुपुरीकर यांचे ते मोठे भाऊ होते. त्यांच्या पश्च्यात कुटुंबात पत्नी, तीन मुली, दोन मुलं, सुनं, नटवंड, भाऊ असा मोठा परिवार आहे. रविवारी उशिरा सायंकाळी नगीनाघाट शमशानभुमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
...

COMMENTS