*अनंत जाधव /मस्साजोग*
*बीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसांदिवस वाढत आहे व केज तालुक्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.*
या बाबत अधिक माहिती अशी की केज तालुक्यातील मस्साजोग येथे एका आठवड्यात कोरोना बाधिताचा रुग्णांचा आकडा ९१ वर पोहोचला होता मात्र ९१ पैकी ६७ कोरोना रुग्णांनी दहा दिवसांत कोरोनावर मात करून सुखरूप घरी परतले आहेत तर २४ रूग्ण पिसेगाव येथील कोविड केअर सेंटर येथे उपचार घेत आहेत मस्साजोग दि.२४ तारखेपर्यंत ३ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे तरी मयताचे नाव सुशालाबाई पांडुरंग घाटूळ वय ६५ वर्षे रा .मस्साजोग यांचे दिनांक २४ शनिवार रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास लोखंडी सावरगाव येथील शासकीय कोंविड सेंटर येथे उपचारादरम्यान कोरोनाने मृत्यू झाला आहे व सुशालाबाई यांना घरी असताना कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या पश्चात , चार पुतने , चार सुना नातवंडे असा घाटूळ परिवार आहे व त्यांच्यावर अंबाजोगाई येथील पठाण माडवा येथील स्मशानभूमीत नातेवाईकांच्या व डॉक्टरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आला.

COMMENTS