गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील प्रकार ; चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
मादळमोही दि, ५ ( संतोष भारती):--
गेवराई तालुक्यातील कोळगाव जवळ सुर्यमंदिर संस्थानवरील राहणा-या मठाधिपती महाराजांनी संस्थान शेजारीच वास्तव्यास असलेल्या एका पंधरा वर्षीय मुलीचा विनयभंग केला. यानंतर मुलीने आरडाओरड केल्यानंतर तिला धमकी दिल्याचा प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून सुर्यमंदिर संस्थानवरील महाराजाविरोधात बाल लैंगिक अत्याचार तसेच अँट्रासिटी अँक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे कल्याण - विशाखापट्टणम महामार्गालगत सुर्यमंदिर संस्थान आहे. या संस्थानवर मागील काही वर्षापासून ह.भ.प.हनुमान महाराज हे मठाधिपती आहेत. तर पिडीत १५ वर्षीय मुलगी हि संस्थानलगतच शेतात आई-वडिलांसह वास्तव्यास आहे. दरम्यान दि.३० रोजी मुलगी घरात एकटीच असल्याचे पाहून हनुमान महाराज यांनी घरात घुसून सदरील पिडीत मुलीला जवळ बोलावून तिच्या अंगावर वाईट हेतूने हात फिरवले. यानंतर मुलीने हात सोडा नाही तर घरच्यांना सांगेन म्हटल्यानंतर महाराज निघून गेले. यानंतर पुन्हा दि.३१ जानेवारी रोजी हनुमान महाराज यांनी सदरील मुलीचे वडील शेतात तर आई माहेराला गेल्याची संधी साधत घरात घुसून पुन्हा जवळ घेऊन तुला मी काल केलेला प्रकार आवडला का ? म्हणून विचारले, तेव्हा पिडीत मुलीने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता महाराजांनी हा प्रकार कोणाला सांगितला तर जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान भितीपोटी हा प्रकार मुलीने वडिलांना सांगितले नाही. मात्र आई माहेराहून परतताच पिडीत मुलीने घडलेला प्रसंग हा आईला सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याविषयी.०४ फेब्रुवारी २०२१ रोजी चकलांबा पोलिस ठाण्यात पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून सुर्यमंदिर संस्थानवरील महाराज हनुमान महाराज यांच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार तसेच अँट्रासिटी अँक्टनुसार गुन्हा क्रमांक २८/२०२१ भादवि कलम ३५४ नुसार दाखल करण्यात आला आहे. तसेच गुन्हाच्आ तपास गेवराई येथील उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.राठोड करित आहे. घटनेचा पंचनामा डीवाय एसपी आणि चकलांबा पोलिस ठाण्यातील एपीआय देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यात आला.
तब्बल पाच दिवसानंतर गुन्हा दाखल
------------------------ ----------
घटना घडल्यानंतर तब्बल पाच दिवसानंतर गुन्हा दाखल झाला आहे,यामुळे पोलिस तपासावर संशय व्यक्त केला जात आहे,गुन्हा दाखल होण्यासाठी विंलब का झाला यांचे उत्तर मिळाले नाही, या प्रकरणी पोलिसावर राजकिय दाबाव तर नव्हताना अशा प्रश्न उपस्थित होत आहे,
वारकारी सप्रंदायाला कलंक
संताच्या शिकवणी मुळे समाज घडत आसतांनाच आशा घटनामुळे वारकारी संप्रदायाकडे पाहणाच्या समाजाच्या दुष्टीकोण बद्दलतोकि काय अशी शंका व्यक्त होत आहे,वारकरी संप्रदायात असे आसाराम जन्माला येवू नयेत अशी चर्चा होत आहे,

COMMENTS