*रासपचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर वाघमोडे यांच्या मागणीवरून जळीत ऊस तोडणीसाठी तात्काळ उपलब्ध करून दिले हरवेस्टर मशीन*
मादळमोही दि,५ (प्रतिनिधी) गेवराई तालुक्यातील गुंतेगाव शिवारामध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी शॉर्टसर्किटमुळे आग लागून 10 ते 15 एकर ऊस जाळून खाक झाला असून यात अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान या जाळीत उसाचा महावितरण कढून पंचनामा करण्यास टाळाटाळ होत आहे. मात्र या शेतकऱ्यांचे जास्तीचे नुकसान होऊ नये म्हणून रासपचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर म.वाघमोडे यांनी गंगामाई कारखान्याचे चेअरमन मा.पद्माकरजी मुळे,रणजित मुळे यांची भेट घेऊन सदरील शेतकऱ्यांचा ऊस तात्काळ न्यावा अशी विनंती केले असता या कारखाण्याकडून ताबडतोब एक हरवेस्टर मशीन देऊन या शेतकऱ्यांचा जळीत ऊस तोडणीला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे सदरील शेतकऱ्यांचे जास्तीचे नुकसान टळले असून या बाबत या सर्व शेतकऱ्यांनी व रासपचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर म.वाघमोडे यांनी कारखान्याचे चेअरमन व्हा. चेअरमन, संचालक, व सर्व आधिकारी कर्मचारी यांचे आभार मानले आहेत.

COMMENTS