केज (प्रतिनिधी) :
महावितरण मध्ये २०१९ मध्ये या सर्व पदांची भरती प्रक्रिया झालेली आहे व मा. सर्वोच्य न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती ९ सप्टेंबर नंतरच्या भरतीवर दिली असून राज्य सरकार मराठा तरुणांना वगळून ही भरती प्रक्रिया करत आहे महावितरण कंपनी मधील अनुक्रमे उपकेंद्र सहायक, विद्युत सहाय्यक, पदवीधारक शिकाऊ अभियंता (वितरण ) व पदवीधारक शिकाऊ अभियंता (स्थापत्य ) इ. पदांकारिता एस.ई. बी. सी. ला वगळून निवड प्रक्रिया सुरु केली आहे यांमुळे हजारो मराठा तरुणांचं वर्तमान आणि भविष्य अंधारात जात आहे सुप्रीम कोर्टाने नमूद केल्याप्रमाणे ९सप्टेंबर २०२० च्या अगोदर पूर्णतःवास गेलेल्या कुठल्याही शैक्षणिक व नौकरभरतीला स्थगिती देता येणारं नाही. मा सर्वोच्य न्यायालयाच्या या सूचनेनंतरही राज्य सरकार मुदामहून महावितरण निवड प्रक्रिया करून मराठा विद्यार्थ्यांवर अन्याय करत आहे ही अतिशय धाकादायक बाब आहे जर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला तर हे दोन वर्ष मराठा विद्यार्थ्यांची वाया जातील व त्यांचा भरती प्रक्रियेवरील विश्वास कमी होईल. त्यामुळे तात्काळ महावितरण ने मराठा विद्यार्थ्यांना ग्राह्य धरून निवड प्रक्रिया पुर्ण करावी अन्यथा क्रांती मोर्चाच्या रोषास सामोरे जावे लागेल व विद्यार्थ्यांच्या सामान्य असंतोषचे रूपांतर उद्रेकाद्वारे ठोक मोर्चात होऊन काही शासकीय मालमतेचं नुकसान झालं तर याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल.

COMMENTS