महेंद्र पुरी, जिल्हा प्रतिनिधी, हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील हट्टा पोलिस ठाण्याचे कर्तबगार ठाणेदार यांनी अवैध धंद्याविरोधात धडक मोहिम सुरू केली असुन शनिवारी संध्याकाळी गुप्त माहिती वरून दोन ठिकाणी जुगार अड्यावर छापा टाकुन 1 लाख 42 हजारांचा मुद्देमाला सह 17 जुगारी गजाआड केले आहेत. हट्टा पोलिस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलिस निरिक्षक गजानन मोरे यांनी काल महामार्गावर वाहनास अडथळा निर्माण करणारी झाडे झुडपे तोडून सामाजीक बांधीलकी जपली तर आज अवैध धंद्यावर कारवाईचा बडगा उगारत सामाजिक बांधिलकी सोबत कर्तव्याशी प्रमाणीक असल्याचेही दाखवून दिले. हट्टा पोलिस ठाण्याचे हद्दीत आडगाव शिवारात तुळजापूरवाडी जाणारे रोड वर झन्नामन्ना जुगारावर छापा टाकुन नगदी सहा हजार रूपये व मोबाईल एक मोटरसायकल, जुगाराचे साहित्य असा एकुण 70 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर दुसरी कारवाई हट्टा पररिसरात करून यामधे नगदी 13 हजार 660, 1 मोटारसायकल आणि मोबाईल असे एकुण 72 हजार 660 रुपये असा दोन्ही कारवाया मिळून 1 लाख 42 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक आयपिएस यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
*अवैधदंधे चालू देणार नाही- मोरे*
हट्टा पोलिस ठाण्याचे हद्दीत कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे खपवून घेणार नाही अशी माहिती हट्टा पोलिस ठाण्याचे ठाणेदार गजानन मोरे यांनी ग्लोबल मराठवाडाशी बोलतांना दिली आहे.


COMMENTS