_______________
केज दि.२४ (प्रतिनिधी): राष्ट्रीय वारकरी परिषदच्या केज तालुका कार्यकारिणी रविवार (ता.२२) रोजी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये तालुकाध्यक्ष पदी रामचंद्र शिर्के यांची तर संपर्क प्रमुखपदी रामदास साबळे यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष संभाजी महाराज खेडकर यांच्या नेतृत्वाखाली तालुका स्तरावर वारकरी संप्रदायाचे काम करण्यासाठी केज तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. यामध्ये तालुकाध्यक्ष रामचंद्र शिर्के, उपाध्यक्ष मेघराज कदम, सहसचिव बाळासाहेब बोबडे, संपर्कप्रमुख रामदास साबळे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गीरी व अनंत ठोंबरे, समन्वयक लिंबाजी पांचाळ तर अशोक चाटे यांची मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली आहे. या कार्यकारिणीतील पदाधिकारी हे वारकरी संप्रदायातील संतांचे विचार सामान्य माणसांपर्यंत पोहचवून वारकरी संप्रदाय वाढीसाठी प्रयत्नशील राहतील, अशी माहिती जिल्हाध्यक्ष संभाजी खेडकर यांनी दिली. या तालुका कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल तालुक्यातील वारकरी संप्रदायातून अभिनंदन केले जात आहे.


COMMENTS