नांदेड/प्रतिनिधी
नांदेडमध्ये आयटीआय ते महात्मा फुले पुतळ्यापासून बस स्टॅन्ड कडे येताना गुरुवारी 7 मे रोजी दुपारच्या सुमारास शिवाजीनगर भागात मोठे बॅनर पडल्याने दुचाकीस्वार तरुण रक्तबंबाळ झाला
शहरातील शिवाजीनगर परिसरातील बल्लेवार फर्निचर दुकानाजवळ लावलेले मोठे बॅनर दुचाकी स्वार कंधार येथील रहिवासी अमोल भास्करराव उंब्रजकर देशपांडे यांच्या अंगावर अचानक पडले .त्यांच्या डोक्याला जबर मार लागला असून आजूबाजूच्या नागरिकांनी जखमी श्री वेंकटेश्वरा हॉस्पिटल येथे उपचारास नेले. डॉ तुंगेनवार यांनी 5 टाके टाकून युवकावर योग्य उपचार केले.
नांदेडमध्ये विनापरवाना बॅनर लावण्याची चढाओढ सुरू आहे. त्यातून रस्त्यावरून येणाऱ्या जाण्याच्या जीवाची पर्वा नसल्याचा संतापजनक प्रकाश घडत आहे.शहराचे विद्रोपीकरण करून सामान्य लोकांच्या जीवाशी जीव घेणा खेळ महापालिका करीत असून महापालिकेसह प्रशासन डोळे झाक करीत असून याकडे कोणाकडे दाद मागावी हा मुळात प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे.शहरात कोणत्याही राजकीय,स्वयं घोषित सामाजिक नेत्याचा पक्ष पक्ष प्रवेश ,वाढदिवस असो, कुठलेही कोचिंग क्लासेस ची जाहिरात असो मनपा यंत्रणेला खिशात घालून ही मंडळी वाट्टेल तसे बॅनर लावतात. कुणाला गंभीर दुखापत होऊ नये अशा प्रकारे काळजी घेताना दिसत नाही.दि7 मे रोजी दुपारी शिवाजीनगर भागात बॅनर पडून ग्भीर जखमी झालेल्या तरुणाचा जीव वाचला असला तरी उपचाराचा खर्च मनपा व बॅनर लावणारे देणार काय असा सवाल केला जात आहे. या जखमी तरुणाने शिवाजी नगर पोलिस ठाणे. मनपा यंत्रणेला ही लेखी अर्ज देऊन दोषींविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.

COMMENTS