माहूर (प्रतिनिधी)पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडलेल्या अल्पवयीन बालिकेवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या...
माहूर (प्रतिनिधी)पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडलेल्या अल्पवयीन बालिकेवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या अमानवीय आणि क्रूर घटनेच्या विरोधात माहूर शहरात तीव्र जनआक्रोश पाहायला मिळाला. पीडितेच्या मारेकऱ्याला त्वरित फाशीची शिक्षा व्हावी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस धोरणे आखावीत या मागण्यांसाठी आज माहूरमध्ये शेकडो नागरिक, महिला आणि विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत भव्य निषेध मोर्चा काढला.
आज सकाळी ११ वाजता शहरातील ऐतिहासिक कपिलेश्वर मंदिर परिसरातून या विराट मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा मेन रोड मार्गे मार्गक्रमण करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचला आणि त्यानंतर थेट तहसील कार्यालयावर धडकला.
मोर्चात सहभागी असलेल्या महिला आणि युवतींच्या हातात 'आरोपीला फाशी द्या', 'पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे' असे फलक होते. "फाशी द्या, फाशी द्या, आरोपीला फाशी द्या!" आणि "महाराष्ट्रात छत्रपती शासन लागू करा!" अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घ्यावी, अशी आक्रमक मागणी यावेळी करण्यात आली.या आंदोलनाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे माहूरमधील महिला आणि युवती शेकडोच्या संख्येने रस्त्यावर उतरल्या होत्या.
यावेळी बोलताना भाजपा महिला मोर्चाच्या नेत्या पद्माताई गिऱ्हे यांनी संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, "अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत आणि नराधमांना फाशीची शिक्षा होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते विनोद सूर्यवंशी, सोनू चौधरी पाटील, अभय जाधव पाटील, महेश आडे, आदित्य पांडे, योगेश परसवाळे, विकास जोशी, कालिदास नैताम, पवन दातीर, विजय हजारे, ऋषिकेश खंदारे आणि केशव जाधव यांच्यासह अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती होती.तहसील कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर शिष्टमंडळाने तहसीलदार अभिजित जगताप यांना निवेदन दिले. या घटनेचा जलद गतीने तपास करून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

COMMENTS