कार्यकर्त्यांना अनिल घुमरेंचे महत्त्व पुर्ण मार्गदर्शन*
केज / प्रतिनिधी
केज नगरपंचायतच्या अनुषंगाने शिवसंग्राम प्रणीत भारतीय संग्राम परिषद च्या वतीने शिवसंग्राम भवन कार्यालय केज येथे नगरपंचायत निवडणुकी संदर्भात महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन शिवसंग्राम युवक आघाडीचे जिल्हा प्रमुख तथा निवडणूक प्रभारी केज रामहरी मेटे व शिवसंग्राम चे जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये केले होते. केज तालुक्यातुन कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी रामहरी मेटे व अनिल घुमरे यांनी कार्यकर्त्यांना महत्वपुर्ण मार्गदर्शन केले. केज नगरपंचायत शिवसंग्राम स्वबळावर पुर्ण ताकदीने लढणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा असे आदेश देखील रामहरी मेटे यांनी बोलताना कार्यकर्त्यांना दिले.या वेळी शिवसंग्राम युवक आघाडी जिल्हा अध्यक्ष रामहरी भैय्या मेटे, शिवसंग्राम सरचिटणीस बीड अनिल घुमरे, शिवसंग्राम केज ता.अध्यक्ष लिंबराज वाघ , अंबाजोगाई ता.अध्यक्ष धनेश जी गोरे,युवक आघाडी ता.अध्यक्ष गणेश खांडेकर, शेतकरी ऊसतोड कामगार मुकादम संघटनेचे नेते नामदेव गायकवाड, क्रषीउत्पन्न बाजार समिती चे संचालक शिवाजी वाघमारे, प्रकाश रोमन, दिपक कोल्हे,अजिम ईनामदार, शेषेराव शिंदे,विशाल नाईकवाडे, अविनाश काळे,शशीकांत दातार, ई.उपस्थित होते.

COMMENTS