कंधार (संवाददाता) दि.५ मे २०२६ कंधार तालुक्यातील शेकापूर येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्र...
कंधार (संवाददाता) दि.५ मे २०२६ कंधार तालुक्यातील शेकापूर येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे यांचा सेवापूर्ती कार्यक्रम दि.१ मे रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी त्यांचा सत्कार करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
शिक्षण क्षेत्रात आयुष्यभर निष्ठेने कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे यांचे नाव आदराने घेतले जाते. अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे माजी सचिव, कुशल प्रशासक, दूरदृष्टी असलेले मार्गदर्शक आणि संवेदनशील समाजसेवक म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. समाजातील दुर्बल व वंचित घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. शिक्षणाच्या माध्यमांतून समाजपरिवर्तन घडवण्याची त्यांची तळमळ , शोषित-पिडीत समुहातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या विशेष उल्लेखनीय कार्य दखल आहे. त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी उपसभापती संभाजीराव केंद्रे होते. यावेळी संस्थेचे सचिव तथा माजी सरपंच शिवाजीराव केंद्रे, उपाध्यक्षा तारमतीबाई संभाजीराव केंद्रे, सहसचिव तथा ग्रामपंचायत सदस्या रेखाताई शिवाजीराव केंद्रे, संस्थापक अध्यक्ष दौलतराव केंद्रे, माजी सरपंच भाऊराव पाटील केंद्रे , सत्कार मुर्ती प्राचार्य मोतिभाऊ केंद्रे ,सौ.सुनिता मोतिभाऊ केंद्रे, मुक्ताबाई केंद्रे, गंगाधर मोरे, शेषराव पाटील केंद्रे,वसंतराव केंद्रे, प्रा. मुकुंद बोकारे, मुख्याध्यापक शिफरकर, प्राचार्य घोरबांड, प्राचार्य मोहन फाजगे, संभाजी वडजे, बालाजी चुकलवाड, माधवराव भालेराव,प्रा अमित मोतिभाऊ केंद्रे, पर्यवेक्षक अमित लोंड, व्यंकटराव पुरमवार, आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय समारोपात संभाजीराव पाटील केंद्रे यांनी सांगितले की, प्रा. मोतीभाऊ केंद्रे यांनी १९९२ मध्ये सेवेत रुजू होऊन मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. शाळा ही शाहू-फुले विचारांनी प्रेरित आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. या शाळेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी शिक्षक, प्राध्यापक, आर्मी, वनरक्षक, डॉक्टर, इंजिनिअर, पोलीस व प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थापक अध्यक्ष दौलतराव केंद्रे यांनी सांगितले की, मोतीभाऊ केंद्रे हे लहानपणापासूनच हुशार, मेहनती आणि मित्रत्व जपणारे होते. संभाजीराव पाटील केंद्रे यांनी शेकापूरमध्ये शिक्षणाची गंगा आणली आणि परिसरातील अनेक विद्यार्थी उच्च पदांवर पोहोचले.
सत्काराला उत्तर देताना प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे म्हणाले की, संभाजीराव पाटील केंद्रे यांनी त्यांना मुलाप्रमाणे सांभाळले व संस्थेची जबाबदारी दिली. त्या विश्वासाला त्यांनी कधीही तडा जाऊ दिला नाही. शिक्षण क्षेत्रातील अनुभवामुळे त्यांना कार्यक्षमतेची ऊर्जा मिळाली. शाळेत शिस्त असल्यास सर्व काही साध्य होते, असेही त्यांनी नमूद केले. सेवानिवृत्तीबाबत समाधान व्यक्त करत त्यांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.
कार्यक्रमाला विविध शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी पुष्पहार घालून सत्कार केला व उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अरुण केदार यांनी केले, तर आभार वसंतराव केंद्रे यांनी मानले.

COMMENTS