जिल्हा प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली
26/11 रोजी झालेल्या अतंकवादी हल्यात शहिद झालेल्या पोलिस अधिकारी कर्मचारी यांना श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी बोलतांना सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांनी खाकी वर्दीशी एकनिष्ठ राहून प्रमाणीक पणे आपले कर्तव्य बजावणे हिच खरी शहिदांना श्रद्धांजली असल्याचे मत व्यक्त केले.
हिंगोली येथे यंग आयपिएस पोलिस अधिकारी यतीश देशमुख हे महिन्यापुर्वी रूजू झाले आहेत. अगदी थोड्याच दिवसात कर्तव्यदक्ष अधिकारी कसा असतो याचे उदाहरण त्यांनी आपल्या कामगिरीतुन दाखवून दिले. यतीश देशमुख यांच्याकडे हिंगोली, वसमत, हिंगोली ग्रामीण उपविभागाचा पदभार आहे. तीनही उपविभागाचा पदभार सांभाळतांना कायद्याची कठोर अमलबजावणी करत पिडितांना न्याय मिळवून देण्याची धडपड त्यांच्या कामगीरीतुन दिसुन आली. आज 26/11 च्या अतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या अधिकारी कर्मचारी यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी यतीश देशमुख यांनी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतांना खाकी वर्दि परिधान करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांनी आपले कर्तव्य प्रमाणीक पणे बजावता वर्दीशी एकनिष्ठ राहून गोर, गरीब, पिडीतांना न्याय देण्याचे काम करावे. हिच खरी खाकी वर्दीतील शहीदांना श्रद्धांजली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपनिरीक्षक गुहाडे, भगवान मंडलीक, पंजाब हराल, जाधव, अँड विधी अधिकारी कुरेलु यांची उपस्थिती होती.

COMMENTS