मुलुंड येथील 5 हजार खाटांचे रुग्णालय बांधण्यासाठी जमीन खरेदीची चौकशी करण्याचे राज्यपालांचे लोकायुक्तांना निर्देश* - *भाजपा नेते डॉ.किरीट सोमैय्या यांची माहिती*

  मुलुंड येथे 5,000 खाटांचे कोविड रुग्णालय बांधण्यासाठी 3 हजार कोटी किंमतीची जमीन खरेदी करण्याच्या मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या निर्ण...


 


मुलुंड येथे 5,000 खाटांचे कोविड रुग्णालय बांधण्यासाठी 3 हजार कोटी किंमतीची जमीन खरेदी करण्याच्या मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या निर्णयाची लोकायुक्तांनी चौकशी करावी असे निर्देश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिले असल्याची माहिती भाजपा नेते डॉ. किरीट सोमैया यांनी शुक्रवारी दिली.या बाबत सोमैय्या यांनी राज्यपालांकडे तक्रार केली होती.


 


माननीय राज्यपालानी ही तक्रार/याचिका लोकायुक्तांकडे पाठविली आहे. याचा तपास लोकायुक्तांनी करावा असे निर्देश माननीय राज्यपाल यांनी दिले आहे.


 


या जमीन खरेदीत घोटाळा झाल्याचा डॉ. सोमैय्या यांचा आरोप आहे.


 


*(मुकुंद कुलकर्णी)*


 


*कार्यालय सचिव*


 


 


*महापौर पेडणेकर यांच्या विरोधात*


 


*किरीट सोमैया यांची उच्च न्यायालयात याचिका*


 


मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी स्वत:च्या पदाचा गैरवापरकरून कुटुंबियांचा व आपल्या कंपनीचा फायदा करून घेतल्याचा आरोप करणारी जनहित याचिका भाजपा नेते डॉ. किरीट सोमैया यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.


 


गरिब झोपडपट्टीवासियांसाठी बांधण्यात आलेले अर्धा डझनहून अधिक गाळे पेडणेकर यांनी बेकायदेशीररित्या, अपारदर्शक पद्धतीने स्वत:च्या, परिवाराच्या, कंपनीच्या ताब्यात ठेवल्या संबंधीचे पुरावे डॉ. किरीट सोमैया यांनी याचिकेत दिले आहेत.


 


खोट्या कागदपत्रांद्वारे, बनावटपद्धतीने या गाळ्यांचा वापर करणे, आर्थिक उत्पन्नाचे साधन बनवणे, झोपडपट्टी पुनर्वसन कायद्याचा भंग करून स्वत:चा फायदा करून घेण्याचे काम महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी वरळी गोमाता जनता सहकारी सोसायटीद्वारा केले, असा आरोप सोमैय्या यांनी केला आहे.


 


या जनहित याचिकेत डॉ. सोमैया यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई महापालिका, राज्य सरकार व अन्य 19 लोकांना प्रतिवादी केले आहे. दिव्या शाह असोसिएट्स सॉलिसीट्सच्या तर्फे ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.


 


*दहिसर जमीन घोटाळ्याच्या विरोधात डॉ. किरीट सोमैया*


 


*यांची लोकायुक्तांकडे याचिका*


 


दहिसर येथे मुंबई महापालिकेने खरेदी केलेल्या 7 एकर जागेच्या खरेदी व्यवहाराची चौकशी करा, अशी मागणी करणारी याचिका भाजपा नेते डॉ.किरीट सोमैय्या यांनी लोकायुक्तांकडे दाखल केली आहे.


 


या याचिकेत डॉ .सोमैय्या यांनी म्हटले आहे की, रु. 2 कोटी 55 लाख मध्ये विकत घेण्यात आलेल्या एक्सर (दहिसर) येथील 7 एकर जागेसाठी मुंबई महापालिकेनी रु. 349 कोटी दिले. निशल्प रिअॅलिटी या बिल्डरने रु. 349 कोटी मुंबई महापालिकेकडून घेतल्यानंतर आणखीन रु. 550 कोटी रुपयांची मागणी केली आहे.


 


ही जागा संपूर्णपणे अतिक्रमण असलेली जागा असून यातले अतिक्रमण काढता येणार नाही व या जागेचा काहीही वापर करता येणार नाही असे महापालिका आयुक्तांनी म्हंटल्यानंतरही महापालिकेनी तडकाफडकी घेतली यासाठी बिल्डरने रु. 900 कोटींची मागणी केली आहे. 


 


आश्चर्याची बाब म्हणजे श्री. अल्पेश अजमेरा (निशल्प रिअॅलिटी प्रा. लि.) यांनी ही जागा 18 ऑगस्ट 2010 ला श्री. मस्करेन्हास यांस कडून रु. 2.55 कोटी मध्ये घेतली. डिसेंबर 2010 मध्ये ही जागा निशल्प रिअॅलिटी बिल्डरनी मुंबई महापालिकेला विकत घेण्यासाठी नोटीस दिली. मुंबई महापालिकेनी जानेवारी 2011 मध्ये ही जागा संपूर्णपणे अतिक्रमणमुक्त असल्यास त्याची किंमत रु. 43 कोटी आखली. 10 वर्षे ही जागा घेण्याचा महापालीकेनी इन्कार केला.


 


परंतु, 28 नोव्हेंबर 2019 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शपथविधी झाला आणि 29 नोव्हेंबर 2019 रोजी मुंबई महापालीकेनी ही जागा रु. 349 कोटींमध्ये विकत घेण्याचे मान्य केले.


 


रु. 349 कोटी घेतल्यानंतर आता बिल्डरने या जागेची किंमत रु. 900 कोटी असल्याचा दावा केला आहे. मुंबई महापालिकेला रु. 2.55 कोटींच्या जागेसाठी रु. 349 कोटी दिले आणखीन रु. 550 कोटींची तयारी ठेवावी लागणार आहे.


 


या व्यवहारात भ्रष्टाचार झाला असून याच्या विरोधात डॉ. किरीट सोमैया यांनी लोकायुक्तांकडे याचिका दाखल केली आहे.


 


*(मुकुंद कुलकर्णी)*


 


*कार्यालय सचिव*


 


[13/11, 19:24] MahaBJPMedia: ...


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group