दिवाळी फराळाच्या निमित्ताने रंगली दिग्गजांची मैफल..... - दिशा सोशल  फाउंडेशनचा उपक्रम

  पिंपरी,  ( दि.13 नोव्हेंबर) पिंपरी चिंचवड शहरातील दिग्गजांची दिलखुलास गप्पांची मैफल शुक्रवारी रंगली. निमित्त होते, दिशा सोशल फाउंडेशनच्या ...


 


पिंपरी,


 ( दि.13 नोव्हेंबर) पिंपरी चिंचवड शहरातील दिग्गजांची


दिलखुलास गप्पांची मैफल शुक्रवारी रंगली. निमित्त होते, दिशा सोशल फाउंडेशनच्या दिवाळी फराळ कार्यक्रमाचे. 


ताथवडे येथील रागा हॉटेल येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.


 यावेळी सर्वांनी खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकांशी मुक्त संवाद साधत, दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला. 


  शहराच्या जडणघडणीत महत्वपूर्ण योगदान असणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना एका व्यासपिठावर आणून त्यांच्यात मनमोकळा संवाद घडावा, या हेतूने या उपक्रमाचे आयोजन दिशा फाउंडेशन करते. यंदाचे या उपक्रमाचे चौथे वर्ष होते. दिवाळी फराळाबरोबरच विचारांची देवाणघेवाण करत दिलखुलास गप्पा झाल्या. दिशाचा हा उपक्रम अखंडितपणे सुरूच रहावा, अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. 


    या कार्यक्रमास खासदार डॉ.अमोल कोल्हे, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार गजानन बाबर, आमदार लक्ष्मण जगताप, भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे, संचालक बाळासाहेब विनोदे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, दिशा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष गोरख भालेकर, पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी उपमहापौर तुषार हिंगे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन चिंचवडे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष जगदीश शेट्टी, अपक्ष गटनेते कैलास बारणे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, संतोष कांबळे, अनिल लोंढे, संतोष बारणे आदींसह दिशाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. 


 यावेळी मान्यवरांना डॉ.अमोल कोल्हे यांचे नुकतेच प्रकाशित झालेले 'शिवगंध' हे पुस्तक भेट देण्यात आले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष गोरख भालेकर, सूत्रसंचालन नाना शिवले तर आभार बाजीराव लोखंडे यांनी मानले.


........................ 


दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने "दिवाळी फराळ"च्या कार्यक्रमात डावीकडून गजानन बाबर, डॉ.अमोल कोल्हे, भाऊसाहेब भोईर, महेश लांडगे, बापूसाहेब भेगडे आदी.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group