सोनपेठ/प्रतिनिधी
तालुक्यातील सायखेडा येथील खाजगी तत्वावर चालणाऱ्या पूर्वीचा महाराष्ट्र शेतकरी शुगर व आता नव्याने कार्यरत असणाऱ्या ट्वेंटीवन साखर कारखान्याच्या माध्यमातून येणारे दूषित मळीयुक्त पाणी गोदावरीत सोडण्यात येत असल्याने गोदावरीच्या पाण्यात असणारे जलचर प्राणी हे न दिसण्याच्या मार्गावर आहेत.सदर पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी कारखाना प्रशासन प्रशासनाने योग्य वेळेत पावले उचलणे गरजेचे होते मात्र ही पावले उचलली नसल्याने सदर पाण्यामुळे जलचर प्राणी आणि गुराढोरांना भविष्यात त्रास होणार आहे त्यामुळे सदर पाण्याचे नियोजन करून येणारे दूषित पाणी टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश कारखाना प्रशासनास द्यावेत अशी मागणी युवासेनेचे तालुकाप्रमुख रामेश्वर मोकाशे यांनी एका निवेदनाद्वारे सोनपेठचे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.या पाण्यामुळे होणाऱ्या नुकसानीस कारखाना प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही या निवेदनातून त्यांनी दिला आहे.


COMMENTS