September 6, 2020 •
.
लातूर जिल्हा प्रतिनिधी
लातुर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवाती पासुन रुग्ण संख्या मोठ्याप्रमाणात निघत आहेत. ऑगस्ट महिन्यात ५९१२ रुग्ण निघाले होते. या महिन्यात १७६७ निघाले असुन आरोग्य विभागाने दिलेल्या अहवालानुसार आज दि. ६ सप्टेंबर रोजी ३३६ कोरोना रुग्ण संख्या सापडले आहेत. उदगीर तालुक्यात ६७ रुग्ण सापडले असुन उपचाराने बरे झालेल्या २१७ जनांना सुट्टी देण्यात आले.
कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असुन प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन अनेक उपाययोजना करीत असली तरी साथ पुर्णपणे अटोक्यात येत नसल्याचे दिसुन येत असुन आज ३३६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ९८७९ रुग्ण कोरोना बाधित निघाले. या रुग्णांवर जिल्ह्यातील कोविड- १९ रुग्णालयात उपचार केल्यानंतर ६९३२ रुग्ण बरे झाले तर उपचारादरम्यान ३१४ रुग्ण दगावली तर २६३३ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज २१७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली.
COMMENTS