208 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 328 बाधितांची भर तर सात मेले

208 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 328 बाधितांची भर तर सात मेले   नांदेड....... रविवार 6 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या...

208 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 328 बाधितांची भर तर सात मेले


 


नांदेड....... रविवार 6 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 208 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 328 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 87 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 241 बाधित आले. 


 


आजच्या एकुण 1 हजार 243 अहवालापैकी 842 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 8 हजार 910 एवढी झाली असून यातील 5 हजार 653 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्या बाधित रुग्णांचे प्रमाणे 65.80 टक्के एवढे झाले आहे. एकुण 2 हजार 937 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 256 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. 


 


 


 


या अहवालात शुक्रवार 4 सप्टेंबर रोजी हदगाव तालुक्यातील तळेगाव येथील 50 वर्षाची एक महिला, शनिवार 5 सप्टेंबर रोजी व्यंकटेशनगर कंधार येथील 85 वर्षाचा एक पुरुष, कंधार तालुक्यातील निपाणी सावरगाव येथील 70 वर्षाची एक महिला, तथागतनगर नांदेड येथील 57 वर्षाचा एक पुरुष तर रविवार 6 सप्टेंबर रोजी दत्तनगर किनवट येथील 60 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर वजिराबाद नांदेड येथील 49 वर्षाचा एक पुरुष, मुदखेड शिकारा येथील 70 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 265 झाली आहे. 


 


आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथील 4, धर्माबाद कोविड केंअर सेंटर 13, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड 5, हदगाव कोविड केंअर सेंटर 9, मुखेड कोविड केंअर सेंटर 80, पंजाब भवन कोविड केंअर सेंटर नांदेड 23, नायगाव कोविड केंअर सेंटर 7, बारड कोविड केंअर सेंटर 1, देगलूर जैनब कोविड केंअर सेंटर 8, किनवट कोविड केंअर सेंटर 18, कंधार कोविड केंअर सेंटर 3, भोकर कोविड केंअर सेंटर 4, माहूर कोविड केंअर सेंटर 2, उमरी कोविड केंअर सेंटर 11, बिलोली कोविड केंअर सेंटर 16, लोहा कोविड केंअर सेंटर 4 असे बाधित व्यक्तींना 208 औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे


 


आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 50, बिलोली तालुक्यात 10, लोहा 3, उमरी 1, हिंगोली 2, हदगाव 5, मुखेड 7, कंधार 7, धर्माबाद 1, निजामाबाद 1 असे एकुण 87 बाधित आढळले.


तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 96, अर्धापूर तालुक्यात 5, मुखेड 60, किनवट 14, नायगाव 18, उमरी 6, धर्माबाद 6, नांदेड ग्रामीण 13, मुदखेड 7, लोहा 5, कंधार 6, हदगाव 2, माहूर 3 असे एकुण 241 बाधित आढळले


जिल्ह्यात 2 हजार 937 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 268, एनआरआय व पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 1 हजार 264, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 101, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 67, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 67, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 105, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 69, लोहा कोविड केअर सेंटर येथे 112, हदगाव कोविड केअर सेंटर 68, भोकर कोविड केअर सेंटर 30, कंधार कोविड केअर सेंटर येथे 37, किनवट कोविड केअर सेंटर येथे 94, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 47, मुदखेड कोविड केअर सेटर 36, माहूर कोविड केअर सेंटर येथे 65, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 52, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 56, उमरी कोविड केअर सेंटर 54, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 6, बारड कोविड केअर सेंटर 5, खाजगी रुग्णालयात 309 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 18, निजामाबाद येथे 2 बाधित, मुंबई येथे 1 बाधित तर हैद्राबाद येथे 5 बाधित, लातूर येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत.


जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती


 



  • एकुण घेतलेले स्वॅब- 55 हजार 616,

  •  

  • निगेटिव्ह स्वॅब- 44 हजार 497,

  •  

  • आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 328,

  •  

  • एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 8 हजार 910,

  •  

  • आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-10,

  •  

  • आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 14,

  •  

  • एकूण मृत्यू संख्या- 265,

  •  

  • एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 5 हजार 653,

  •  

  • रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 937,

  •  

  • आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 474, 

  •  

  • आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 256. 



 


 


कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   


 


 


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group