सीसीटीव्ही फुटेज महिन्यात दोनदा वरिष्ठांंना पाठवा ; स्ट्रीटलाईट अन्य साधनांच्या दुरुस्तीचे दिले आदेश.
माजलगाव : प्रतिनिधी
माजलगाव धरण दि.5 सप्टेंबर रोजी 76 टक्क्यांवर भरले असून पैठणच्या नाथसागराचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून जायकवाडीच्या उजव्या कालव्याद्वारे 500 क्यूसेस वेगाने सोडण्यात आले असून माजलगाव धरणाच्या परिस्थीतीचा आढावा जलसंपदा विभाग कडा भवन औरंगाबादचे मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक दिलीपराव तवार यांनी अचानक भेट देवून घेतला.
यावेळी धरण परिसरातील बंद करण्यात आलेला रस्त्यांवरील स्वच्छता करुन खुला करण्यासह स्ट्रीट लाईट सुरु करुन घेण्यासाठी सूचना केल्या असून धरण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महिन्यात दोन वेळा वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यासाठीच्या सूचना दिल्या,त्यासोबतच धरणावरील कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड बंधनकारक करण्यासंदर्भात आदेश देण्यात आले,अपुऱ्या कर्मचाऱ्यांबाबत वरिष्ठ कार्यालयास तात्काळ कळविण्यास सांगितले,धरणावरील गेटच्या रूळचे काम व्यवस्थीत करुन तत्काळ साफसफाई करण्यास कंत्राटदारास कळवा,धरण रिपेअरिंगसाठी संबधित अधिकाऱ्यांना अन्य कुठल्याही अडचणी आपणांस येत असतील तर तात्काळ कळवा जेणे-करुन त्याची आम्ही लवकरात लवकर पूर्तता करु असे कर्मचाऱ्यांना बोलतांना मुख्य प्रशासक व मुख्य अभियंता दिलीपराव तवार म्हणाले.यावेळी माजलगाव पाटबंधारे विभागाचे (परळी वैजनाथ) कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर साहेब,धरण अभियंता बि.आर.शेख,सि.एम.झेंड,सुधीर कुलकर्णी ,एम.के.जाधव,श्रीहरी मस्के,राजेंद्र देशमुख यांच्या सह कर्मचारी उपस्थीत होते.
COMMENTS