...
------------------------
नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )
अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्याच्या कारणावरून नोकरीवरून काढलेल्या अधिकारी/कर्मचारी यांना आठ महिन्यापासून सेवेत घेतले नाही. त्यांना पदावर नियुक्ती द्यावी.अनुसूचित जमातीचे जात पडताळणी प्रमाणपत्र फसवणुकीने रद्द करून अधिकारी कर्मचारी यांना अधिसंख्य ठरविणारा २१/१२/१९ चा शासन आदेश रद्द करावा .एक जुलै २०२० रोजी देय असलेली वार्षिक वेतनवाढ पूर्ववत देण्यात यावी.ज्या कर्मचाऱ्यांना न्यायालयाने सेवा संरक्षण दिले त्यांचे अधिसंख्य पदाचे आदेश रद्द करावेत.ज्या कर्मचाऱ्यांची जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रलंबित आहेत,त्यांची अधिसंख्य पदाचे आदेश रद्द करावेत. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे आर्थिक लाभ तात्काळ व्याजासहित देण्यात यावेत. सूडबुद्धीने वागणाऱ्या सर्व जात पडताळणी समित्या बरखास्त कराव्यात..या व इतर काही महत्त्वाच्या मागण्यासाठी समस्त आदिवासी जमाती कडून आफ्रोह संघटनेच्या वतीने ७ सप्टेंबर २०२० रोजी संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे...या आंदोलनास विविध संघटनांनी व संस्थांनी पाठिंबा दिलेला आहे... सर्व अधिकारी/कर्मचारी बांधवांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन आफ्रोह संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे...
COMMENTS