धर्माबाद - महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या क्रीडा व युवक सेवा संचनालय पुणे-१ अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधि...
धर्माबाद - महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या क्रीडा व युवक सेवा संचनालय पुणे-१ अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्याद्वारे जिल्हा क्रीडाअधिकारी कार्यालय इनडोअर हॉल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी संजय बेतेवार व क्रीडा अधिकारी विपुल दापके यांच्या उपस्थितीत वुशु जिल्हास्तरीय संघटना श्री प्रमोद वाघमारे यांच्या सहकार्याने आयोजित वुशू जिल्हास्तरीय स्पर्धा काल 16 सप्टेंबर 2026 रोजी संपन्न झाल्या. त्यात धर्माबाद येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाची विद्यार्थिनी शरयू दत्तात्रय सीतावार (बारावी सायन्स) हिने आपले उत्कृष्ट असे शास्त्रशुद्धरित्या प्रदर्शन करत 19 वर्षाखालील 60 किलो खालील गटात कुमते (फाईट) या खेळ प्रकारात प्राविण्य मिळवून जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवत विभागीय पातळीवर परत एकदा आपला दबदबा कायम ठेवलाआहे.
या खेळात नांदेड जिल्ह्याचे महिला स्वयंसिद्धाचे जिल्हा अध्यक्ष सौ रंजना आढाव मॅडम व शिकाई मार्शल आर्ट चे जिल्हा अध्यक्ष श्री चंद्रकांत आढाव सर तसेच धर्माबाद तालुका क्रीडा संयोजक श्री अहमद लड्डा आणि ड्रॅगन मार्शल आर्टअकॅडमी चे ग्रँडमास्टर श्री दत्तात्रय सीतावार यांचे मौलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या यशाबद्दल लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कमलाकर कणसे सर ,उपप्राचार्य जोशी सर, श्री रांदड सर, श्री बालाजी शिरगिरे सर आणि श्री बोधनकर सर, क्रीडा शिक्षक श्री विष्णू जाधव सर व सर्व प्राध्यापक वृंद यांनी तिचे कौतुक केले आहे. ज्यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये खेळाबद्दल एक प्रकारची आवड निर्माण होत आहे. तसेच सर्व क्रीडाप्रेमींकडून तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

COMMENTS