नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातून एक अतिशय संतापजनक आणि चीड आणणारी घटना उघडकीस आली आहे. घरासमोर अंगणात खेळणाऱ्या एका निष्पाप चिमुकलीवर नात...
नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातून एक अतिशय संतापजनक आणि चीड आणणारी घटना उघडकीस आली आहे. घरासमोर अंगणात खेळणाऱ्या एका निष्पाप चिमुकलीवर नात्याने काका लागणाऱ्या नराधमाने चॉकोलेटचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. या प्रकरणी लोहा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंगणात खेळताना घडला प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, २४ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास पीडित चिमुकली घरासमोरील अंगणात खेळत होती. याच वेळी शेजारी राहणाऱ्या नातेवाईक आरोपीने तिला चॉकोलेटचे आमिष दाखवून सोबत नेले. साधारण २० ते २५ मिनिटांनंतर आरोपी मुलीला पुन्हा घरी आणून सोडून निघून गेला. मुलगी सतत रडत असल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. आईने मुलीकडे विचारपूस केली असता, संबंधित व्यक्तीने तिच्यासोबत गैरकृत्य केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला.
पीडितेवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
मुलीला दुखापत झाल्याचे निदर्शनास येताच पालकांनी तिला तातडीने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
आरोपी फरार, पोलिसांकडून कसून शोध सुरू
पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून लोहा पोलिसांनी २५ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास संशयित आरोपीविरुद्ध पॉक्सो (POCSO) कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या अमानुष कृत्यामुळे लोहा परिसरात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

COMMENTS