(विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांना मिळणार नवे व्यासपीठ; विविध डिजिटल प्रकल्पांचे सादरीकरण)
नांदेड :(दि.१५ सप्टेंबर २०२६)
श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय, नांदेड येथील संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांना चालना देण्यासाठी 'चार्ल्स बॅबेज ॲक्टिव्ह फोरम’ व ‘डेनिस रिची आयटी क्लब’ या विद्यार्थी अभ्यासमंडळांचे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी डिजिटल माध्यमातून दिमाखात उद्घाटन करण्यात आले. माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या हस्ते या दोन्ही अभ्यासमंडळांचे उद्घाटन झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे होते. यावेळी विभागप्रमुख डॉ. श्रीकांत जाधव, माजी विभागप्रमुख डॉ. प्रदीप पाठक, अभ्यासमंडळाचे समन्वयक डॉ. प्रवीण तामसेकर तसेच विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
डेनिस रिची आयटी क्लबच्या कार्यकारिणीत अध्यक्ष कु. अनुष्का जैस्वाल, उपाध्यक्ष कु. ऐश्वर्या व्ही. हामंद, सचिव कु. साक्षी यू. लांडगे, उपसचिव श्री. विजय आर. इंगोले व कोषाध्यक्ष कु. समिक्षा कोकाटे यांचा समावेश आहे.
यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः विकसित केलेल्या विविध डिजिटल प्रकल्पांचे सादरीकरण केले. बी.एस्सी. तृतीय वर्षाच्या कु. लुबना फातिमा एम.डी. कादर, कु. सयमा यामीन सय्यद कलीमुद्दीन, कु. रिझना अल अम्शन अब्दुल व कु. अर्विशा ताहुरा अब्दुल कय्यूम यांनी ‘डिजिटल वॉल’तसेच विभागाचे संकेतस्थळ हे प्रकल्प विकसित करून त्यांचे सादरीकरण केले. या माध्यमातून विभागातील विविध कार्यक्रम, स्पर्धा व शैक्षणिक उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हीच विद्यार्थी प्रकल्प टीम डेनिस रिची आयटी क्लबच्या सदस्यांमध्ये समाविष्ट आहे.
यासोबतच विद्यार्थ्यांनी डॉक्टर अपॉइंटमेंट मोबाईल ॲप्लिकेशन तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या ऑनलाईन बुकिंगसाठी डिजिटल प्रणाली यांसारख्या संकल्पनांवर आधारित उपक्रमही सादर केले. या प्रकल्पांमधून विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष तांत्रिक ज्ञानाचा, कल्पकतेचा व समस्या सोडविण्याच्या क्षमतेचा प्रत्यय आला.
चार्ल्स बॅबेज ॲक्टिव्ह फोरमच्या वतीने बी.सी.एस. प्रथम वर्षाचे विद्यार्थी रुद्र साबणे व राजवीर मनन यांनी अभ्यासमंडळाचे संकेतस्थळ विकसित केले. तसेच कु. ऐश्वर्या हामंद व त्यांच्या विद्यार्थी समूहाने आजच्या डिजिटल युगातील मुलींसाठी सायबर सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करणारी माहितीपूर्ण व्हिडिओ शॉर्ट फिल्म सादर केली.
यावेळी डेनिस रिची आयटी क्लबचे विद्यार्थी सदस्य श्री. गायकवाड सचिन अशोक, श्री. वायपणकर गंगाप्रसाद सी., श्री. कदम रितेश पी., कु. चव्हाण भाग्यश्री आर., कु. देशमुख मानसी जी., कु. लुबना फातिमा एम.डी. कादर, कु. सयमा यामीन सय्यद कलीमुद्दीन, कु. रिझना अल अम्शन अब्दुल, कु. अर्विशा ताहुरा अब्दुल कय्यूम, कु. मद्रेवार अंजली ए., श्री. मावडे रितेश के., कु. पांडे संस्कृती आर., श्री. इशांत जैस्वाल, कु. सफुरा फातिमा शेख कय्यूम, कु. तेलंगे निशा एस. व श्री. एम.डी. रायान जुबेर कुरेशी यांची उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या डिजिटल उपक्रमांचे कौतुक केले. संगणक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने होत असलेल्या बदलांचा स्वीकार करून विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे, कौशल्यविकासावर भर द्यावा आणि भविष्यातील आव्हाने स्वीकारण्यासाठी स्वतःला सक्षम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. श्रीकांत जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभ्यासक्रमाबरोबरच प्रत्यक्ष प्रकल्प, तांत्रिक उपक्रम व नवोपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. प्रदीप पाठक, डॉ. प्रवीण तामसेकर, प्रा. गुरुप्रसाद चौसटे, प्रा. सीमा शिंदे, प्रा. सुशील महेंद्रकर, प्रा. चेतन देशमुख, प्रा. निकिता बागल, प्रा. दुर्गेश चव्हाण, प्रा. वैशाली पवार, श्री. माणिकराव कल्याणकर, सुनीता भालके व बळवंत शिंदे यांनी परिश्रम घेतले.
डेनिस रिची आयटी क्लबच्या फॅकल्टी ॲडव्हायझरी कमिटीमध्ये डॉ. पी. बी. पाठक, डॉ. सौ. एस. एम. शिंदे, श्री. जी. बी. चौसटे, कु. एन. ए. बागल, कु. व्ही. सी. पवार, श्री. डी. व्ही. चव्हाण, श्री. एस. एस. महिंद्रकर व डॉ. सी. डी. देशमुख यांचा समावेश आहे.
या दोन्ही अभ्यासमंडळांच्या माध्यमातून आगामी काळात तांत्रिक स्पर्धा, कार्यशाळा, प्रकल्प, डिजिटल उपक्रम, नवोपक्रमात्मक कार्यक्रम आणि कौशल्यविकासाच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना या संकल्पनेतून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक गजानन पाटील, जगन्नाथ महामुने यांनी सहकार्य केले.

COMMENTS