श्री आनंद दत्तधाम आश्रमात मुस्लिम बांधवांनी घेतला महाप्रसादाचा लाभ श्रीक्षेत्र माहूर माहूर गडावरील श्री आनंद दत्त धाम आश्रमाचे मठाधीश राष्...
श्री आनंद दत्तधाम आश्रमात मुस्लिम बांधवांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
श्रीक्षेत्र माहूर
माहूर गडावरील श्री आनंद दत्त धाम आश्रमाचे मठाधीश राष्ट्रसंत दभप साईनाथ महाराज वसमतकर यांचे आग्रहाखातर माहूर शहरासह तालुक्यातील अनेक मुस्लिम बांधवांनी आश्रमास भेट देऊन प्रवचनाचा लाभ घेत महाप्रसाद ग्रहण करून माहूर गड सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असल्याची प्रचिती देत यापुढेही श्री आनंद दत्तधाम आश्रमांकडून जेव्हा जेव्हा साद येईल त्यावेळी आम्ही हजर राहू अशी ग्वाही सर्वा समक्ष दिली
यावेळी मान्यवर मुस्लिम बांधवासह उपस्थित दत्तभक्तांना बोलताना राष्ट्रसंत दभप साईनाथ महाराज वसमतकर यांनी सांगितले की मोहनजी भागवत यांच्या विचारांचे अनुसरण केल्यास देश जगात क्रमांक एक वर येईल यात शंका नसून त्यांनी सर्वधर्मसमभाव जोपासल्याने आज देश प्रगतीपथावर आहे मोहनजी भागवत आज जगात सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून ओळखले जात आहेत असे सांगितल
श्री आनंद दत्तधाम आश्रमात संविधान मंदिराची स्थापना झाल्यापासून सर्व धर्मीय नागरिक आश्रमात येऊन कीर्तनासह महाप्रसादाचा लाभ घेत आहेत श्री साईनाथ महाराजांनी सुरू केलेल्या दशसुत्री कार्यक्रमांतर्गत देशाला एकसंघ जगात सर्व धर्म समभावाचे प्रतीक बनविण्यासाठी साईनाथ महाराज रात्रंदिवस परिश्रम घेत असून नुकताच श्री मोहनजी भागवत यांनी हीच बाब सांगितल्याने त्याची सुरुवात श्री आनंद दत्तधाम आश्रमातून करण्यात आली आह
यावेळी बाबा सोनापीर दर्गाहचे मुजावर मुतवल्ली शेख बाबर शेख फकीर मोहम्मद यांनी साईनाथ महाराजांचे कार्य संत पेक्षा सरस असल्याने आम्ही त्यांच्यावर विश्वास टाकून येथे उपस्थित झालो आहोत असे सांगून महाराजांनी कुठल्याही कार्यक्रमास बोलविल्यास आम्ही हजर राहू अशी ग्वाही त्यांचे विचार ऐकून दिली यावेळी सय्यद अजीम भाई यांनी सांगितले की साईनाथ महाराजांच्या आश्रमात कधीच जातीभेद केला गेला नसल्याने आम्ही त्यांच्या माघारी मुस्लिम बांधवांना घेऊन आश्रमास भेट देऊन महाप्रसादाचा लाभ घेत असतो साईनाथ महाराजांचे कार्य खरोखरच सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी ज्येष्ठ पत्रकार तथा मार्गदर्शक नंदू संतान यांनी सांगितले की साईनाथ महाराजांनी जो उपक्रम सुरू केलेला आहे तसा उपक्रम आजवर कुठल्याही संत महंतांनी राबविला नसल्याने यांचे कार्य अलौकिक असून त्यांनी सर्वधर्मसमभाव अंतर्गत दशसूत्रि राबवून प्रत्येक समाजाच्या नागरिकाचे मने स्वतः सोबत जुळवून घेत जातीभेद नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याने त्यांच्या कार्याची दखल भारत सरकार नक्कीच घेईल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली
यावेळी शेख फरीद बाबा दर्गाह वझरा येथील मुजावर मुतवल्ली शेख इस्माईल भाई पत्रकार इलियास बावाणी यांचे सह मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आभार प्रदर्शन एस एस पाटील यांनी केले कार्यक्रमाचे सांगता राष्ट्रगीताने झाली

COMMENTS