अर्धापूर: राष्ट्रीय महामार्गावर असना पुलाखाली अर्धापूर ते विमानतळ मार्गे जाणाऱ्या कारला मध्यप्रदेश राज्य परिवहन महामंडळाच्या बसने (क्रमांक M...
अर्धापूर: राष्ट्रीय महामार्गावर असना पुलाखाली अर्धापूर ते विमानतळ मार्गे जाणाऱ्या कारला मध्यप्रदेश राज्य परिवहन महामंडळाच्या बसने (क्रमांक MP 68 P 0321) जोरदार धडक दिली. दि.३० ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास घडलेल्या या अपघातात कारमधील एका प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जेटन रामजी टेकाळे (वय ५२) रा. दाभड ता. अर्धापूर असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
सविस्तर माहिती, अर्धापूर तालुक्यातील दाभड येथील एकाच कुटुंबातील सदस्य कारने असना पुलाखालून अर्धापूर-विमानतळ मार्गे लोहाकडे जात होते. त्याच वेळी कामठा ते अर्धापूर जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरून मध्यप्रदेश राज्य परिवहन महामंडळाची बस भरधाव वेगात आली. पुलाखालून जाणाऱ्या कारला या बसने जोरदार धडक दिली. या मार्गावर वेगमर्यादेचे बंधन असतानाही बसचालक अतिवेगात होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
आसना टि पॉईंट जवळ झालेल्या या भिषण अपघातात कारमधील सर्व प्रवासी गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिक आणि १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान जेटन रामजी टेकाळे यांचा मृत्यू झाला. सायंकाळी दाभड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातात रेणुकाबाई जेटन टेकाळे (वय ४५), अजय जेटन टेकाळे (वय २७), संध्या अजय टेकाळे (वय २०) तिघे रा. दाभड ता.अर्धापूर, तर मनोहर शिवानंद कपाटे (वय २८) रा. येळेगाव, ता. अर्धापूर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे दाभड व परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS