* शिव भक्तांना गोपू भाऊ मित्र मंडळाकडून टी-शर्ट वाटप.
राम दातीर
माहूर (प्रतिनिधी)पवित्र श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी दि. 7 ऑगस्ट माहूर शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात भव्य 'बम बम भोले, कैलास पती कावड यात्रे'चे आयोजन करण्यात आले होते. 'बम बम भोले', 'हर हर महादेव'च्या गगनभेदी जयघोषाने आणि शिवभक्तांच्या अलोट गर्दीने संपूर्ण माहूरनगरी दुमदुमून गेली होती.
यात्रेची सुरुवात स्थानिक कपिलेश्वर मंदिरातुन करण्यात आली. येथे मंदिरात पुजारी विकास जोशी यांच्या हस्ते महादेवाला सपत्नीक अभिषेक आणि रुद्राभिषेक घालण्यात आला. सकाळी १० वाजता भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक गोपु महामुने, ऍड. रमण जायभाये व नंदकुमार संतान यांच्या हस्ते कावड आणि शिवप्रतिमेची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर वाजत गाजत, ढोल-ताशांच्या गजात कावड यात्रेला प्रारंभ झाला.
या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे 'गोपू भाऊ मित्र मंडळा'कडून सहभागी सर्व शिवभक्तांना 'बम बम भोले, कैलास पती कावड यात्रा' असे नाव छापलेल्या टी-शर्टचे वाटप करण्यात आले होते. हजारो शिवभक्त हे टी-शर्ट परिधान करून हातात कावड घेऊन सहभागी झाल्याने शहरात सर्वत्र भक्तीमय वातावरण होऊन भगवेमय झाले होते.
मिरवणूक मार्गावर शहरातील महिलांनी जागोजागी सडा टाकून आणि आकर्षक रांगोळ्या काढून कावड यात्रेचे भक्तीभावे स्वागत केले. जागोजागी कावडीचे पूजन करण्यात आले. मिरवणूक ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचल्यानंतर शिवप्रतिमेला पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्या. त्यानंतर स्व. वसंतराव
नाईक चौकात सेवालाल महाराज समितीच्या वतीने यात्रेतील सर्व शिवभक्तांसाठी उपवासाची उसळ, खिचडी आणि फळांचे वाटप करण्यात आले. कडक उन्हातही शिवभक्तांचा उत्साह दांडगा होता. अल्पोपहारानंतर कावड यात्रा पुढे कैलाश टेकडीकडे मार्गस्थ झाली. कैलाश टेकडीवर भगवान शिवशंकराला कावडीने आणलेल्या पवित्र जलाचा अभिषेक करून यात्रेची सांगता झाली.
या कावड यात्रेत विनोद पाटील सुर्यवंशी, निखिल राठोड, सोनू चौधरी, विजय आमले, अनिल वाघमारे, निळकंठ मस्के, नंदकुमार जोशी, पद्मा जयंत गि-हे, निलेश तायडे, चंद्रकांत देवरशे, पवन शर्मा, नंदु कोलपवार, जयंत गिऱ्हे, श्रीनिवास महाराज, देवांश घाटोळे, प्रमोद माने, गौरव जयस्वाल, सदानंद पुरी, बालाजी गेंटलवार, मंगेश, योगेश परसवाळे, शिवदत्त परसवाळे, विकी सुने, सुनील सूर्यवंशी, आनंद महाराज मरवाळे, संतोष तामखाने, कालिदास नैताम, अनुजा गिऱ्हे यांच्यासह परिसरातील हजारो महिला व पुरुष शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेप्रमाणे यंदाही या कावड यात्रेचे अत्यंत सुनियोजित आणि यशस्वी नियोजन विनोद सूर्यवंशी, निखिल राठोड, बालाजी गेंटलवार, ऋषी व गोपू भाऊ मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी केले. शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

COMMENTS