शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ई-केवायसीसाठी मुदतवाढ देण्याची मराठवाडा शिक्षक संघाची मागणी

आधारमधील नाव, जन्मतारीख व इतर तपशील दुरुस्तीच्या अडचणींमुळे तीन ते चार महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी  नांदेड - राज्यातील खाजगी अनुदानित,...


आधारमधील नाव, जन्मतारीख व इतर तपशील दुरुस्तीच्या अडचणींमुळे तीन ते चार महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी 

नांदेड - राज्यातील खाजगी अनुदानित,अंशतः अनुदानित,व जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील शालार्थ प्रणाली मधून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तीन ते चार महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ई-केवायसी पूर्ण करताना आधार कार्डवरील नाव व शालार्थ प्रणालीतील नाव जुळत नसणे, जन्मतारीख किंवा लिंगामध्ये तफावत असणे, तसेच विवाहानंतर महिलांच्या नावात झालेला बदल यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना अडचणी येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

विशेषतः काही महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडे नावातील बदलासाठी आवश्यक Gazette प्रमाणपत्र उपलब्ध नसते. नावातील बदलाची जाहिरात प्रसिद्ध होण्यासाठी साधारणपणे १५ ते २० दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर आधारमधील नाव दुरुस्तीसाठी संबंधित कार्यालयात प्रक्रिया करावी लागते. तसेच आधारमधील बदल UIDAI प्रणालीमध्ये अद्ययावत होण्यासाठीही काही कालावधी लागत असल्याने ई-केवायसीची प्रक्रिया निर्धारित मुदतीत पूर्ण करणे अनेक कर्मचाऱ्यांना शक्य होत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या सर्व बाबींचा विचार करून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी किमान तीन ते चार महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी. तसेच नावाची स्पेलिंग, जन्मतारीख, लिंग आदी किरकोळ दुरुस्त्यांसाठी आवश्यक ती कार्यवाही स्थानिक स्तरावर करण्याची सुविधा द्यावी, अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, सहसचिव रेखा सोळुंके, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव चिलवरवार, आनंद मोरे, राजेश कदम, जयवंत शिंदे, झहीर खान यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन संबंधित प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group