नांदेड:नांदेडकडून भोकरकडे जाणाऱ्या मिनी मॅजिक व्हॅनचा सिताखंडी घाटामध्ये भीषण अपघात झाला आहे. या दुर्दैवी अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाल्...
नांदेड:नांदेडकडून भोकरकडे जाणाऱ्या मिनी मॅजिक व्हॅनचा सिताखंडी घाटामध्ये भीषण अपघात झाला आहे. या दुर्दैवी अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांना घेऊन जाणारी मिनी मॅजिक व्हॅन सिताखंडी घाटातून जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकासोबत तिची भीषण धडक झाली. ही धडक एवढी जोरदार होती की मॅजिक व्हॅनचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी आणि इतर वाहनधारकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली.
मदतकार्य सुरू, जखमींवर उपचार
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. रस्त्यावर विखुरलेल्या जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून सुरू असून, या घटनेमुळे नांदेड-भोकर मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. रात्रीच्या वेळी घाटातील वळणावर हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

COMMENTS