धामनदरीतील विकासकामांच्या चौकशीसाठी आमरण उपोषण

१५ वा वित्त आयोग, तांडावस्ती, ठक्कर बाप्पा, दलितवस्ती व पेसा निधीतील गैरव्यवहाराचे आरोप; ग्रामस्थांचा प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम किनवट...

१५ वा वित्त आयोग, तांडावस्ती, ठक्कर बाप्पा, दलितवस्ती व पेसा निधीतील गैरव्यवहाराचे आरोप; ग्रामस्थांचा प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम
किनवट : तालुक्यातील मौजे धामनदरी येथील विविध विकासकामांमध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी भगवान तुकाराम कांबळे यांच्यासह ग्रामस्थांनी सोमवार, ७ सप्टेंबरपासून किनवट उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, मागील चार वर्षांच्या कालावधीत धामनदरी ग्रामपंचायतीच्या कारभारात नियमित ग्रामसभा व मासिक सभा घेण्यात आल्या नसल्याचा आरोप आहे. प्रत्यक्ष सभा न घेता कागदोपत्री ठराव करून १५ वा वित्त आयोग, तांडावस्ती सुधार योजना, ठक्कर बाप्पा सुधार योजना, दलितवस्ती सुधार योजना तसेच पेसा योजनेअंतर्गत निधीचा गैरवापर झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
सिमेंट रस्ते, बांधिस्त नाली, सार्वजनिक पाणीपुरवठा, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, शुद्ध जलपुरवठा आणि जलजीवन मिशनअंतर्गत काही कामे अर्धवट अथवा निकृष्ट असतानाही कागदोपत्री पूर्ण दाखवून निधी उचलल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. विशेषतः जलजीवन मिशनच्या कामांची चौकशी करून संबंधित कंत्राटदार, अधिकारी, सरपंच व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून नियमाप्रमाणे वसुली करण्याची मागणी करण्यात आली आहे.
१५ ऑगस्टच्या ग्रामसभेबाबतही ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सभा तहकूब झाल्यानंतर निश्चित केलेल्या तारखेला ग्रामस्थ उपस्थित असतानाही सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित राहिले नसल्याचा आरोप निवेदनात आहे.
या प्रकरणी २४ ऑगस्ट रोजी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊनही अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याने उपोषणाचा निर्णय घेतल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे. २०२४ ते २०२६ या कालावधीतील सर्व विकासकामांची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच गैरव्यवहार झाल्यास शासन निधीची वसुली करावी, अशा प्रमुख मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत.
उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना किंवा नुकसान झाल्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group