उमरी प्रतिनिधी
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार परमपूज्य अनंत महाराज बेलगावकर यांच्या मुखारविंदातून श्रीक्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर येथे आयोजित शिवमहापुराण कथा अत्यंत भक्तिमय व उत्साही वातावरणात संपन्न झाली.
या कथा महोत्सवाला महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील असंख्य भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिव तत्वाचे सखोल निरूपण, पौराणिक दाखले आणि ओघवती वाणी यामुळे महाराजांनी सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
केवळ कथा श्रवणच नव्हे, तर या निमित्ताने भाविकांना निसर्गरम्य स्थळांची सैर आणि अनेक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्याचे परमभाग्य लाभले. या यात्रेदरम्यान भाविकांनी संत दर्शन, संत पूजन आणि ब्राह्मण भोजन यांसारखे पुण्यकार्य केले. दरम्यान माणिकनगर येथील सिध्दराज माणिकप्रभू महाराजांचे दर्शन,
गाणगापूर दर्शन,
श्रीक्षेत्र मुकांबिका देवी दर्शन, कर्नाटकातील जगप्रसिद्ध उडपी येथील श्रीकृष्ण मंदिरात भाविकांनी दर्शन घेतले. धर्मस्थलम येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, श्री मंजुनाथाचे दर्शन घेऊन भाविकांनी महाप्रसाद घेतला, विद्येची देवता शारदांबा मातेचे दर्शन आणि जगद्गुरु शंकराचार्य महाराज यांचे आशीर्वाद घेण्याचे दुर्मिळ भाग्य भक्तांना लाभले, वरदहळी येथे श्रीधर स्वामी महाराजांच्या समाधीचे दर्शन तर हेबळी येथे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकांचे दर्शन आणि संत पूजन करण्यात आले. येथील महान संत दता आण्णा महाराज, नर्मदा तीरावरील संत श्री
विठ्ठल महाराज नेमावर, मुंकूद महाराज आदीचे पूजन करून आशीर्वाद घेण्यात आले. तर तेथे
धनंजय महाराज, श्रीराम महाराज यांची उपस्थिती होती.
कोकण-कर्नाटकातील निसर्गरम्य परिसराचा आनंद घेत ही संपूर्ण यात्रा भक्तिमय वातावरणात पार पडली,शिवमहापुराण कथा महोत्सवाचा अधिकृत समारोप समारंभ बागलकोट येथील उद्योजक द्वारकादास कासट यांच्या फॅक्टरीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्व भाविकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. आयोजकांनी कथाकार परमपूज्य अनंत महाराज बेलगावकर यांचा सत्कार करून या भव्य दिव्य सोहळ्याची सांगता केली.
यावेळी वेदमूर्ती लक्ष्मीकांत महाराज, किर्तनकार मोहन महाराज खुर्दळीकर, वेदमूर्ती दिलीप महाराज लोणावळेकर, मृदंगाचार्य श्याम महाराज सातारकर,
वेदमूर्ती किशोर महाराज, विनोद गंदेवार, रमेश चिद्रावार, सूर्यकांत गुंडाळे, सुनील कामिनवार, नरेंद्र येरावार, गंगाधर शक्करवार, पंकज भंडारी, दिलीप कामिनवार, भागवत येरावार, उत्तम वट्टमवार, बालाजी वाघमारे, नरसिंग वंगावार, तुळशीराम भुसेवार, लोकमनवार, शोभाताई चिद्रावार, गुंडरे, रमेश सिंदोल, चलवदे, खांडेकर, तुकाराम चौधरी, दिवाकर कुलकर्णी, विठ्ठलराव मीनकीकर, दिगंबर नायगावकर, संगनवार, गुजरवार, बिडवई, कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन कृष्णकांत यांच्या मातोश्री ललिताताई, आंबादास सुर्यवंशी, भागवत सूर्यवंशी यांच्यासह लातूर, अहमदपूर, चाकूर, नांदेड, धुळे, पुणे, मुंबई सह महाराष्ट्रातील अनेक भाविक भक्त महिलांनी शिवमहापुराण कथा श्रवणाचा आनंद घेतला. सर्वच धार्मिक कार्यक्रमातील सुञसंचालन पञकार नरेंद्र येरावार यांनी केले.
......................................

COMMENTS