नांदेड : ८ सप्टेंबर
महाराष्ट्रातील भाविकांना अध्यात्म, पर्यटन, इतिहास आणि संस्कृतीचा अद्वितीय अनुभव देणारी १२ व्या ‘संत नामदेव‘ घुमान यात्रे ची जय्यत तयारी झाली असून यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जवळपास १८० जणांनी नाव नोंदणी केली आहे.
तारीख १५ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२६ दरम्यान ही घुमान यात्रा पंजाब -हरियाणा -दिल्ली -घुमान- चंदीगड -कुरुक्षेत्र दौऱ्यावर येणार आहे. ना नफा ना तोटा या तत्त्वावर आधारित सामाजिक बांधिलकी जोपासणारी एकमेव यात्रा असून दिल्ली, पानिपत, कुरुक्षेत्र, चंदीगड, शक्तिपीठ माता नैना देवी, भाक्रा नांगल धरण, वाघा बॉर्डर, जालियनवाला बाग, सुवर्णमंदिर अमृतसर, लव कुश जन्मस्थळ, आनंदपूर साहिब, तख्त दमदमा साहिब भटिंडा, गोविंदवाल साहिब, कार्तिकी स्वामी अचलेश्र्वर धाम, आणि संत नामदेव महाराज यांची कर्मभूमी श्री क्षेत्र घुमान या पवित्र स्थळांचे दर्शन घडवणार आहे.
नानक साई फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री पंढरीनाथ बोकारे 📞(9823260073) यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी नियमितपणे ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडते. या इतिहासिक यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन नानक साई फाऊंडेशन चे उपाध्यक्ष सुभाष बल्लेवार, माधवराव पटणे, सतीश देशमुख, जी नागय्या,तुलसीदास भुसेवार, हरिदास भट्टड, तुकाराम कोटूरवार,जे एच पिंनलवार, प्रा राजेश मुखेडकर,पुंडलिक बेलकर, विनायक पाथरकर,डॉ गजानन देवकर, विश्वजित भावे, राजकुमार चौगुले, शिवाजी कऱ्हाळे,विलास पडवळ, बळीराम पवार, पंढरीनाथ पगार, सुनील निकम, गंगाधर पांचाळ, सौ प्रफुल्ला बोकारे,संजय कदम, उत्तमराव देशमुख,श्रेयस कुमार बोकारे यांनी केले आहे.

COMMENTS