नांदेड, दि. ३ जुलै : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार २ जुलै २०२६ रोजी नांदेड येथे शालेय पोषण आहाराची तपासणी...
नांदेड, दि. ३ जुलै : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार २ जुलै २०२६ रोजी नांदेड येथे शालेय पोषण आहाराची तपासणी करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी शिल्पा श्रीरामे यांनी सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी व्ही. एस. लोंढे, अरुण तम्मडवार, अमृता दुधाटे आणि अ. नं. गिरी यांच्या पथकासह दोन शाळांमधील पोषण आहार विभागाची तपासणी करून विविध अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेतले.
बाबानगर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात रिफाइंड सोयाबीन तेल, सोया वडी, तांदूळ आणि तूर डाळ यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. तसेच सोया वडी या अन्न पदार्थाचा उर्वरित साठा (३९८ किलो), तांदूळ (२,९९८ किलो) आणि तूर डाळ (९९८ किलो) असा एकूण २ लाख २४ हजार ५३० रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला.
यानंतर वसंतनगर येथील राजर्षी शाहू विद्यालयात सोया वडी, तांदूळ आणि मूग डाळ यांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. येथे उर्वरित ९८ किलो सोया वडीचा ९ हजार ८०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
प्रयोगशाळेतील विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ही कारवाई सहायक आयुक्त सु. द. जिंतुरकर तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे सहआयुक्त (अन्न) श्रीकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी शिल्पा श्रीरामे व त्यांच्या पथकाने पार पाडली.
0000

COMMENTS