उदगीर / प्रतिनिधी :
स्वामी विवेकानंद ग्रामसेवा प्रतिष्ठान संचलित महात्मा पब्लिक स्कूल, उदगीर येथे महाराष्ट्र राज्याचे माजी क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री तथा उदगीर-जळकोट मतदारसंघाचे लोकप्रिय आ. संजयजी बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपणाचा सुंदर उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणही करण्यात आले.
शाळेचे संचालक दिपक नेत्रगावे पाटील तथा संचालिका सौ. संगीताताई नेत्रगावे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी काजोल मिरजगावे (युती शहराध्यक्ष), सुनिता कोटलवार (युती कार्याध्यक्षा) तथा कविता घाटे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास संचालिका सौ. संगीताताई नेत्रगावे, काजोल मिरजगावे, सुनिता कोटलवार, कविता घाटे, शाळेचे मुख्याध्यापक आनंद चिंचोले तसेच शाळेतील कर्मचारी प्रदेवी वाडीकर, विश्रांती पारसेवार, स्वाती चिंचोले, रेचल सुर्यवंशी, उज्वला भालेराव मावशी अदि उपस्थित होते..
संजय भाऊ बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले हे सामाजिक व शैक्षणिक उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास्पद ठरले.

COMMENTS