माहूर (प्रतिनिधी )हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उबाठा गटातून शिवसेनेत प्रवेश केल्याने माहूर तालुक्यातील राजक...
माहूर (प्रतिनिधी )हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उबाठा गटातून शिवसेनेत प्रवेश केल्याने माहूर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. दोन्ही बाजूनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांनी खा.नागेश पाटील यांना तुम्ही माहूर तालुक्यात फिरून दाखवा असे आव्हान दिले आहे.त्याचा शिवसेनेचे तालुकासंघटक विनोद पाटील सूर्यवंशी यांनी चांगलाच समाचार घेतला असून शिवसैनिक म्हणून तुमच्या सोबत अनेक वर्षे काम केलेले आहे,तुमच्या बारीक सारीक बाबी आम्ही पूर्णपणे जाणून असल्यामुळे तुम्ही अधिकची निष्ठा पाजळू नका, आम्ही तोंड उघडलं तर तुम्हांला तोंड बाहेर काढणे सुद्धा मुश्किल होईल याचे भान ठेवा, असा ज्योतिबा खराटे यांचेवर कडाडून हल्ला केला आहे.शहरातील संपर्क कार्यालयात दि. 3 जुलै रोजी स. 11 वा.शहरप्रमुख विकास कपाटे यांचे उपस्थितीत विनोद सूर्यवंशी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे माजी खा. सुभाष वानखेडे यांचेशी गद्दारी करुन काँग्रेसचे दिवंगत खा. राजीव सातव यांची झोळी कशी भरली, याची आठवण ताजी केली.याशिवाय ज्या बंजारा समाजाचा आज पुळका दाखवता त्याच बंजारा समाजाचे नेते डॉ. बी. डी. चव्हाण यांना विधानसभा निवडणुकीत तुम्ही कसे छळले,त्यांचेशी कसे कपट केले,या बाबीसह तुमचे बेगडी प्रेम तो समाज चांगलाच ओळखून आहे, असा चिमटा त्यांनी काढला.तसेच माहूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तुम्ही हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला कशी तिलांजली दिली हे उभं राजकीय जगत जाणून आहे,असा प्रहार सूर्यवंशी पाटलांनी केला. परवाच्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही विद्यमान आ. बाबुराव कदम कोहळीकर यांचेशी मैत्री कशी जपली त्याचे गुपित आता उघड झाले याचे भान ठेवा असा इशाराही त्यांनी दिला.तुम्ही सध्याला चालविलेला खेळखंडोबा, तुमची सुरु असलेली केविलवाणी धडपड केवळ सारखणी येथे पार पडलेल्या विशाल मेळाव्याच्या धास्तीचे प्रतीक होय असे सांगून त्यांनी आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे सच्चे पाईक आहोत,आमच्या पाठीशी एकनाथ शिंदे साहेबांचे आशिर्वाद आहेत, त्यामुळे तुमच्या कुठल्याही धमक्याला आम्ही वधणार नाही,

COMMENTS