उदगीर / प्रतिनिधी : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवडीसह संवर्धन करणे काळाची गरज बनली असल्याचे मत निडेबन जिल्हा परिषद सदस्य डॉ. दिपक सोमवंशी यांनी व्यक्त केले. ते जीवन विकास निवासी मतिमंद कार्यशाळा जाणापूर रोड कौळखेड यांच्या वतीने हरीत क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित व राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आ. संजय बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व फळे वाटप कार्यक्रमात बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, वृक्षतोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी होत चालले असून आगामी काळात वृक्ष लागवड व संवर्धन मोठ्या प्रमाणात करण्याचा मानस असून या कामी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. असेही ते म्हणाले. या कार्यक्रमासाठी पवन चव्हाण मल्लापूरकर, पोलीस पाटील मिलिंदजी वाघमारे, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाबुराव राठोड, उपसरपंच मालोजी वाघमारे, ग्रामरोजगार सेवक उत्तम वाघमारे, गोविंद महाराज, युवा नेते अविनाश गायकवाड, प्रेम गायकवाड, शिवा पकोळे यांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बिपीनजी पवार, सुनिलजी जाधव,मनोजजी चव्हाण, सुरेशजी चव्हाण, गणेशजी राठोड यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रा. पटेल यांनी केले तर आभार बिरादार सर यांनी मानले.

COMMENTS