उस्माननगर (प्रतिनिधी) दि. ११ मार्च उस्माननगर येथील जेष्ठ नागरीक व नागय्या स्वामी संस्थान चे मठाधिपती तथा सहायक जिल्हा नियोजन अधिकारी प्रभा...
उस्माननगर (प्रतिनिधी) दि. ११ मार्च उस्माननगर येथील जेष्ठ नागरीक व नागय्या स्वामी संस्थान चे मठाधिपती तथा सहायक जिल्हा नियोजन अधिकारी प्रभाकर मठपति यांचे वडिल,वैजनाथप्पा गुंडप्पा मठपति यांचे (दि.११मार्च) मार्च रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.ते (८५वर्षाचे) होते. लिंगायत समाजातील आध्यात्मिक क्षेत्रातील त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. नागोराव पांडे वैद्यकीय ट्रस्टच्या वतीने जिवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. दि.१२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता उस्माननगर येथील जंगम स्मशानभूमीत त्यांचे पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पश्चात पत्नी, से.नि.विस्तार अधिकारी सदशिव मठपति , दोन मुली, जावाई नातु पंतु असा परिवार आहे.

COMMENTS