नांदेड - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने घरगुती गॅस सिलेंडर मध्ये प्रतिनग ६० रूपये दर वाढ केली असुन सर्व सामान्यांच आर्थिक कंबरडे मोडले आहे....
नांदेड - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने घरगुती गॅस सिलेंडर मध्ये प्रतिनग ६० रूपये दर वाढ केली असुन सर्व सामान्यांच आर्थिक कंबरडे मोडले आहे. या दरवाढी विरोधात उद्या गुरूवारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता जिल्हा काँग्रेस पक्षाच्यावतीने खासदार श्री रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात येणार आहेत. या धरणे आंदोलनात नांदेड जिल्ह्य़ातील काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, काँग्रेस सेवा दल, एन एस यु आय ओबीसी सेल आदी विविध सेलच्या कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन नांदेड जिल्हा काँग्रेस (उतर) चे अध्यक्ष श्री राजेश पावडे, दक्षिणेचे जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, नांदेड महानगर अध्यक्ष अब्दूल सत्तार, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, काँग्रेस महानगर सरचिटणीस आनंद कल्याणकर यांनी केले आहे.

COMMENTS