मी पालकमंत्री असताना 'महारेल'च्या माध्यमातून नांदेड-लातूर नवीन रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल तयार करून घेतला होता. त्यानंतर विधानसभेत पाठपुरावा करून हा प्रस्ताव राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्यानुसार रेल्वे मंत्रालयाने 'फायनल लोकेशन सर्व्हे' पूर्ण केला आहे.
नांदेड-लातूर हा केवळ मराठवाड्यातील दोन शहरांना जोडणारा मार्ग नसून, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जवळ आणणारा एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. पूर्वीपासूनच निर्माणाधीन असलेला वर्धा-यवतमाळ-नांदेड आणि नांदेड-लातूर हा नवीन प्रकल्प पूर्ण झाल्यावर विदर्भातील नागपूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील मिरज या दोन प्रमुख जंक्शनमधील अंतर तब्बल १८४ किलोमीटरने कमी होईल.
या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे सातत्याने मोलाचे सहकार्य लाभले आहे.

COMMENTS