दस्तुरकर हे मराठवाड्याच्या विकासप्रश्नांचे चालते-बोलते विद्यापीठ : प्रा. बालाजी कोम्पलवार
नांदेड, प्रतिनिधी :मराठवाडा शिक्षक संघटनेचे विधान परिषदेतील माजी प्रतिनिधी तथा दिवंगत आमदार पी. जी. दस्तुरकर हे शिक्षकांच्या प्रश्नांसह मराठवाड्याच्या विकासाच्या मुद्द्यांचे चालते-बोलते विद्यापीठ होते, असे गौरवोद्गार मराठवाडा जनता विकास परिषद जिल्हाध्यक्ष, सेवानिवृत्त प्राचार्य प्रा. बालाजी कोम्पलवार यांनी काढले.
मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे दिवंगत आमदार पी. जी. दस्तुरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी एक शिक्षिका महापौरपदी विराजमान झाल्याबद्दल सौ.कविता मुळे व यूपीएससी परीक्षेत 282 रंग मिळवून यशस्वी झालेले ऋषिकेश पालीमकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष व्यंकटराव चिलवरवार यांनी केले
कार्यक्रमास जी. एस बुरांडे, विश्वंभर भोसले, ‘दैनिक प्रजावती’चे संपादक शंतनू डोईफोडे, कार्यकारिणी सदस्य सरदार नवनिहाल सिंग जागीरदार, ॲड. कॉम्रेड प्रदीप नागापूरकर, ना रा जाधव, आनंद भंडारे, विठ्ठल भंडारे जी.व्ही.माने रातोळे, मोरे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रा. कोम्पलवार पुढे म्हणाले की, माजी आमदार दस्तुरकर यांचा विविध क्षेत्रांतील सखोल अभ्यास होता. चळवळीतील त्यांच्या दांडग्या अनुभवामुळे त्यांनी विधिमंडळात शिक्षकांसह मराठवाड्याच्या विकासाच्या प्रश्नांना प्रभावीपणे न्याय दिला. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असो किंवा मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरानंतर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ निर्मितीसाठी समिती गठीत करण्याचा विषय असो, प्रत्येक महत्त्वाच्या कार्यात दस्तुरकर यांनी स्वतःला झोकून दिले होते. त्यांच्या निधनाने मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन बाळगणारा अभ्यासू नेता आपण गमावला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी प्रमुख वक्ते जी एस बुरांडे म्हणाले की मराठवाडा शिक्षक संघटनेच्या संघटनात्मक बाबींवर दस्तुरकर यांचे बारकाईने लक्ष असे. त्यामुळे संघटना मजबूत राहिली. पुढील काळात मराठवाडा शिक्षक संघटना एकसंघ करून या मतदारसंघातून संघटनेचाच प्रतिनिधी निवडून द्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. या महापौर मुळे यांनी शिक्षकांना शिकविण्यापेक्षा ऑनलाइनचीच कामे जास्त करावी लागतात त्यामुळे शिकविण्यास वेळ मिळत नाही. मी एक शिक्षिका आहे आणि आयुष्यभर शिक्षिका म्हणूनच कार्य करत राहणार असे सांगून संघटनेच्या कार्याचे कौतुक केले.
संपादक शंतनू डोईफोडे यांनी दस्तुरकर यांच्यासोबत काम करतानाच्या आठवणींना उजाळा दिला. प्रमोद दस्तुरकर यांनीही आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देत भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालक प्रा. आनंद कर्णे यांनी आभार जयवंत शिंदे यांनी मानले. याप्रसंगी डी बी नाईक ,आनंद मोरे आर पी वाघमारे, गणेश बडुरे, बालाजी टिमकीकर विजयालक्ष्मी स्वामी, बाबाराव घाटे, राम येडते, गंगाधर तेलंग, अशोक मोरे, कांजाळकर माधव, वसमते, व्यंकट हुलगुंदे, मोहन पिनाटे, लक्ष्मण कोंडावार रमेश पाटील, बालाजी वसमते, मिलिंद सर्जे, प्रशांत चौधरी, मंगेश चाभरेकर, प्रशांत मारलेवा ड, यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी व शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

COMMENTS