शेतकरी संघटनेचे वीस मार्च ला बोधडी येथे रास्ता रोको आंदोलन- रमेश कदम पाटील.

दि. 13 मार्च   मागील चार महिन्यां पासून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शेतकरी संघटना पाठपुरावा करीत आहे. शासनाकडून कोणताही प्रतिसाद नसल्या...

दि. 13 मार्च   मागील चार महिन्यां पासून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शेतकरी संघटना पाठपुरावा करीत आहे. शासनाकडून कोणताही प्रतिसाद नसल्याने 20 मार्च रोजी सकाळी 11.00 वा. भगवान बाबा चौक बोधडी बु. ता. किनवट येथे रास्ता रोको चे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन युवा आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष रमेश कदम पाटील यांनी केले आहे.किनवट तालुक्यात दहा हजार हेक्टरवर मका पिकाची पेरणी झाली असून पीक काढणीस तयार आहे. अजूनही शासनाने हमीभावाने खरेदीची कोणतीही तयारी केली नसल्यामुळे शेतकऱ्यांना सतराशे रुपये दराने मका विकण्याची वेळ आली आहे. शासनाने खरेदी केल्यास शेतकऱ्यांचे 55 कोटी रुपयांचे नुकसान टळणार आहे. गाव पातळीवर महिला बचत गटाला खरेदीचे अधिकार दिल्यास साडे सहा कोटी रुपयांचा नफा होऊन महिला सक्षमीकरण होणार आहे. वरील मागण्यांसह बोधडी व ईस्लापुर एम एस ई बी सब स्टेशनचे दहा मेगा वॅट अपग्रेडेशन करून कृषी पंपाचा वीज पुरवठा नियमित करावा. बोधडी, इस्लापूर, टिंगनवाडी सह तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना शेतीमध्ये सिंगल फेज वीज पुरवठा करावा. मौजे बोधडी बु. शिवारात मागील वीस वर्षांपूर्वी वसलेल्या गोकुळवाडी वस्तीला तहसीलदाराने भेट देऊन पाहणी करावी. या आदिवासी वस्तीतील नवाटी धारकांचे पट्टे करून द्यावेत. वस्तीत गावठाण व कृषी पंपाचा वीज पुरवठा करावा, रस्ता तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. सीसीआयची कापूस खरेदी मुदत वाढवावी. स्लॉट बुकिंगच्या कचाट्यात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन पंचनामे करुन शेवटच्या बोंडा पर्यंत शासनाने हमीभावाने कापूस विकत घ्यावा. या मागण्यांसाठी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर भारत व्यंकटराव राठोड इस्लापूर सर्कल प्रमुख, आत्माराम पाटील  नागझरी, श्रीनिवास जमादार बोधडी बु., प्रकाश बाबाराव राठोड रोडा नाईक तांडा, सचिन उत्तम राठोड रोडा नाईक तांडा, नारायण धारबाजी दराडे निचपुर, माणिकराव पाटील हडसणी, राजकुमार मारोतराव हसबे वरचे मारेगांव, ओमेश विठ्ठलराव जाधव तोटंबा, बालाजी पाटील जाधव नंदगाव, गोरखनाथ आनंदराव जाधव मानसिंग नाईक तांडा, मोहन हुन्ना जाधव अंबाडी इत्यादी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel