नांदेड प्रतिनिधी :पत्रकारीता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करून समाज हिताच्या साठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या अनेक मान्यवरांचा लोक जनजागृती स...
नांदेड प्रतिनिधी :पत्रकारीता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करून समाज हिताच्या साठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या अनेक मान्यवरांचा लोक जनजागृती संस्थेच्या वतीने मागील दहा वर्षापासून पुरस्कार देऊन सन्मान केला जातो यावर्षी ही विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यावर्षी पत्रकार न्याय चक्र पुरस्कार.दैनिक जगमित्र चे जिल्हा प्रतिनिधी शेख मौला यांना जाहीर झाला असून दिनांक 29 मार्च 2026 रोजी नांदेड शहरातील देवकृपा फंक्शन हॉलमध्ये लोकजनशक्ती पार्टीचे खासदार अरुण भारती प्रदेश अध्यक्ष प्रमोद कुदळे व संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार सितळे यांच्या हस्ते हा पुरस्कार जेष्ठ पत्रकार शेख मौला यांना प्रदान करण्यात येणार आहे.
शेख मौला यांनी आजवर अनेक नामावंत वर्तमानपत्रांमध्ये आपली लेखणी चालवून अनेक गोरगरीब सामान्य जनतेला आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम केलं आहे. वीस वर्षापासून पत्रकारितेच्या माध्यमातून अनेकांना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे. या कार्याची दखल घेऊन लोक जनजागृती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार सितळे यांनी त्यांना 2026 या वर्षाचा पत्रकार न्यायचक्र पुरस्कार नुकताच घोषित केला आहे.या पुरस्काराबद्दल त्यांचे संपादक .ज्येष्ठ पत्रकार व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

COMMENTS