उमरी - रेल्वे स्टेशनच्या जवळ एलसी गेट क्रमांक 165 एक ट्रॅक्टर ट्रॉली व त्याच्या मागच्या उंच ट्रॉलीने रेल्वे गेटच्या बुमला टक्कर मारल्यामुळे ...
उमरी - रेल्वे स्टेशनच्या जवळ एलसी गेट क्रमांक 165 एक ट्रॅक्टर ट्रॉली व त्याच्या मागच्या उंच ट्रॉलीने रेल्वे गेटच्या बुमला टक्कर मारल्यामुळे गेट क्षतीग्रस्त झाला व ते बूम वरील लाईन करंटला लागली. त्यामुळे पूर्ण रेल्वेची 33 के व्ही बंद झाली. ह्यामुळे सर्व गेटची आवक- जावक थांबल्या गेली. नंतर ह्या गेट वर वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आल्या. ही घटना 27 फेब्रुवारी 2026 रोजी घडली.ट्रॅक्टर गेट ला धडक मारल्यामुळे इकडे बरेच नुकसान झाले असून धर्माबाद आरपीएफ अधिकारी व कर्मचारी यांनी ताबडतोब उमरी एलसी नंबर 165 गेटला अटेंड केले व ते ट्रॅक्टर जप्त केले. आरोपी दारूच्या नशेत होता व त्याचे मेडिकल करण्यात आले असून ते मेडिकल पॉझिटिव्ह आले. आरोपीला अटक करून त्याच्यावर रेल्वे कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला गेला. त्याचा cr NO:365/2026 u/ sec,145(a)154 Railway ऍक्ट, आरोपीला तात्पुरत्या स्वरूपाची पोलीस स्टेशन येथे बेल देण्यात आली. वरील घटनेचे एफ आय आर संभाजीनगर रेल्वे न्यायालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास सब इन्स्पेक्टर राम आशिष कुमार आरपीएफ धर्माबाद करीत आहेत.
.jpg)
COMMENTS