लातूर: लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार आता श्री. प्रकाश मुकुंद यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. शिक्षण आयुक्तालय, महाराष्...
लातूर:
लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार आता श्री. प्रकाश मुकुंद यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने दि. ११ मार्च २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
दत्तात्रय मठपती झाले सेवानिवृत्त
यापूर्वी या पदाचा अतिरिक्त कार्यभार लातूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. दत्तात्रय मठपती यांच्याकडे होता. मात्र, मठपती यांनी स्वेच्छासेवानिवृत्तीसाठी (VRS) अर्ज सादर केला होता. त्यानुसार, ४ मार्च २०२६ रोजी ते सेवानिवृत्त झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.
मिपा'सह लातूर विभागाची जबाबदारी
नवे उपसंचालक श्री. प्रकाश मुकुंद हे सध्या छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा) येथे उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत. शासनाच्या नवीन आदेशानुसार, मुकुंद यांना त्यांच्या मूळ पदाचा कार्यभार सांभाळून लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक पदाची अतिरिक्त जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

शिक्षण सहसंचालक (प्रशासन) हारून आतार यांनी या नियुक्तीचे आदेश दिले असून, मुकुंद यांनी हा कार्यभार त्वरित स्वीकारून तसा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

COMMENTS