नांदेड,- नांदेडच्या सुप्रसिद्ध साहित्यिक आणि पोलिस अधिकारी डॉ.ज्योती कदम यांना ८ मार्च रोजी जागतिक महिलादिनानिमित्त शब्द प्रतिभा बहुक्षेत्री...
नांदेड,- नांदेडच्या सुप्रसिद्ध साहित्यिक आणि पोलिस अधिकारी डॉ.ज्योती कदम यांना ८ मार्च रोजी जागतिक महिलादिनानिमित्त शब्द प्रतिभा बहुक्षेत्रीय सन्मान फाउंडेशन नेपाळच्या वतीने ’स्त्री शक्ति सन्मान’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.नेपाळ भारत मैत्री विकास, मिथिला तथा अवध सांस्कृतिक पर्यटन विकास, देवनागरी लिपीचे संरक्षण संवर्धन, हिंदी तथा नेपाळी भाषेच्या मैत्री भाषेच्या रुपात प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. देश विदेशात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या ३०० महिला कवयित्री, समाज सेविका आणि शिक्षिका महिलांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यामध्ये डॉ.ज्योती कदम यांना साहित्य आणि संशोधन क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित या पुरस्काराने गौरविण्यात आले आले.साहित्य आणि पोलिस प्रशासन क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी डॉ.ज्योती कदम यांचे अभिनंदन केले आहे. डॉ.ज्योती कदम या मराठी, हिंदी भाषेच्या साहित्यिक असून त्यांची आठ पुस्तके प्रकाशित आहेत. यापूर्वीही त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.शब्द प्रतिभा बहुक्षेत्रीय फाउंडेशन नेपाळ ही संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर एक ख्यातकिर्त संस्था असून विविध साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करत असते. पुरस्कार समितीचे संयोजक डॉ. प्रीती प्रसाद प्रीत यांनी सर्व प्रतिभावंत पुरस्कार प्राप्त महिलांचे याप्रसंगी अभिनंदन केले आहे.

COMMENTS