नांदेड (प्रतिनिधी)
नांदेड शहरात असलेल्या गोदावरी नदी काठावर मोठ्या प्रमाणात मे. शारदा कंट्रक्शन च्या वतीने मोठ्या प्रमाणात कोठेवाडी चे कामे चालू आहेत पण गोदावरी नदी पात्रात नांदेड शहरातून गटाराचे वर नालीचे घाण पाणी १७ नाल्याद्वारे गोदावरी नदीमध्ये मिश्रित होत असल्यामुळे त्या गोदावरी नदीचे पावित्र्य अस्तित्वात राहिले नाही त्यामुळे गोदावरी नदी आहे का गटार नदी असे घाणीचे साम्राज्य गोदावरी नदीपात्रात १७ नाल्याचे पाणी जाऊन प्रदुर्शित होत आहे त्यामुळे नांदेड शहरातील गुरुगोविंद सिंगजी यांचे तीर्थस्थान आहे त्यामुळे गोदावरी नदीला अनेक परराज्यातून येणारे भाविक स्नान करत असतात पण अनेक ठिकाणी या नदीच्या पात्रात १७ ठिकाण शहरातील गटार व नालीचे घाण पाणी जात असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे या नाल्याचे काम मे. शारदा कंट्रक्शन कंपनीला दिले असून या कंपनीचे मालक व महापालिकेचे अधिकारी यांना हाताशी धरून नांदेड शहरातील होत असलेल्या कोट्यावधीच कामे हे निकृष्ट दर्जाचे करून ही पोळी भाजून घेत आहेत त्यामुळे मे.शारदा कंट्रक्शनच्या कामाचे सखोल चौकशी करण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेविका सौ नीलमताई तुलजेश यादव यांनी थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री श्री ना एकनाथ शिंदे साहेब यांची मुंबई येथे भेट घेऊन प्रत्यक्षात त्यांना भेटून निवेदन देण्यात आले व नांदेड शहरातील मे शारदा कंट्रक्शन कंपनीच्या कामाची चौकशी होईपर्यंत त्यांना बिल देण्यात येऊ नये असेही शिवसेनेच्या नगरसेविका सौ नीलमताई तुलजेश यादव यांनी मंत्री महोदय यांना सांगितले यावेळी मंत्री महोदय यांनी निवेदन स्वतः वाचून बघितले आणि तात्काळ चौकशी करण्याच्या सूचना दिले असल्याचे शिवसेना नगरसेविका सौ नीलमताई तुलजेश यादव यांनी सांगितले आहे यावेळी उपस्थित तुलजेश यादव शिवसेना शहर प्रमुख नांदेड दक्षिण उपस्थित होते

COMMENTS