नवी दिल्ली : सध्याच्या युद्धकाळात समुद्रामध्ये जहाजावर काम करणाऱ्या नाविकांच्या व्यवसाय व सुरक्षेबाबत न्यूसीचे जनरल सेक्रेटरी श्री. मिलिंद कांदळगावकर यांनी दिल्ली भेटीत केंद्रीय वाहतूक मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांची भेट घेतली. भारतीय नावीक सुरक्षेच्या उपाययोजनाना केंद्र सरकारचा संपूर्ण पाठिंबा आहे. असे केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी सांगितले.
दिल्ली भेटीत भारतातील सर्व भागांतील भारतीय नाविकांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याण, सुरक्षितता व व्यावसायिक हितसंबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर महत्त्वपूर्ण सविस्तर चर्चा झाली. त्यावेळेस मंत्री महोदयांनी देशभरातील नाविकांच्या हक्क, कल्याण आणि सन्मानाच्या संरक्षणासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे मनापासून कौतुक केले. भारतीय सागरी व्यावसायिक आणि त्यांच्या कुटुंबियांना पाठबळ देण्यात नुसीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे मंत्री महोदयांनी नमूद केले, तसेच भारतीय सागरी कामगारवर्ग अधिक सक्षम करण्यासाठी संघटनेच्या सामाजिक बांधिलकी बाबत मंत्री महोदयांनी गौरवोउद्गार काढले, असे न्यूसीचे जनरल सेक्रेटरी श्री. मिलिंद कांदळगावकर यांनी सांगितले.
मंत्री महोदयांनी भारतीय नाविकांच्या हितसंबंधांचे प्रतिनिधित्व आणि संरक्षण करण्यासाठी न्यूसी करत असलेल्या कार्याला आपला संपूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. दिल्ली भेटी दरम्यान मंत्री महोदयांनी दिलेले प्रोत्साहन आणि सकारात्मक दृष्टीकोन निश्चितच आम्हाला नव्या आत्मविश्वासाने पुढे कार्य करण्याची प्रेरणा देईल. यापुढे भारतीय नाविकांच्या कल्याण, सुरक्षितता आणि व्यावसायिक प्रगतीसाठी आपण अधिक प्रभावीपणे कार्य करू, असे मिलिंद कांदळगावकर यांनी सांगितले.
आपला
मारुती विश्वासराव

COMMENTS