उदगीर / प्रतिनिधी : सिद्धार्थ नगर (निडेबन वेस) येथील विश्वरत्न, बोधीसत्व, महामानव प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रेम गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली असून उपाध्यक्ष : महेश गंडारे, सचिव: मोहन गंडारे, कार्याध्यक्ष : प्रतिक गायकवाड,कोषाध्यक्ष ; लक्ष्मण पकोळे यांची निवड तर मुख्य मार्गदर्शक म्हणून राजकुमार भालेराव, अनिल मुदाळे,प्रदीप गायकवाड,प्रा.राजू कांबळे ,प्रा.संजय जामकर , शिवाजी गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.
जयंती महोत्सव समितीचे ज्येष्ठ सदस्य विनायक चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेऊन ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.या बैठकीस लक्ष्मण पकोळे ,पद्मशील गायकवाड, मनोज गायकवाड, प्रविण मसुरे, शिवाजी पकोळे, विशाल चौधरी, आशिष चौधरी, धनाजी पकोळे, शुभम गायकवाड, संदेश चौधरी, दिनेश वासरे,ऋतुराज भालेराव, आशिष गायकवाड, मैथिल जामकर, बुद्धम चौधरी, सचिन पकोळे, महेश शिंदे, शुभम गंडारे, विकी गायकवाड, संघपाल गायकवाड, मुकेश गायकवाड, विजय सोनकांबळे, नितीन गायकवाड, दिपक सरवदे, अविनाश गायकवाड ,तुळशिदास मसुरे, शैलेश गायकवाड यांची उपस्थिती होती.नुतन कार्यकारिणीत निवड करण्यात आलेल्या सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन होत आहे.

COMMENTS